संसाराचा गाडा आणि ग्रामपंचायतीचा कारभारही सोबतीने, सरपंचपदी पती, उपसरपंच पत्नी

औरंगाबाद जिल्ह्यातील आब्दीमंडी ग्रामपंचायतवर सरपंचपदी पतीची तर उपसरपंचपदी पत्नीची निवड झाली आहे (Aurangabad Gram Panchayat Sarpanch)

संसाराचा गाडा आणि ग्रामपंचायतीचा कारभारही सोबतीने, सरपंचपदी पती, उपसरपंच पत्नी
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 8:28 AM

औरंगाबाद : संसाराचा गाडा एकमेकांच्या साथीने चालवणारे दाम्पत्य आता ग्रामपंचायतीचा कारभारही एकत्र चालवणार आहेत. आधी पठाण दाम्पत्य ग्रामपंचायतीत एकत्र विजयी झाले, त्यानंतर सरपंचपदी पतीची तर उपसरपंचपदी पत्नीची निवड करण्यात आली. औरंगाबादमध्ये ही आगळी वेगळी घटना घडली आहे. (Aurangabad Aabdimandi Gram Panchayat Husband Wife Sarpanch)

घरातला कारभारी आणि कारभरीणच गावातही कारभारी कारभारीण ठरले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील आब्दीमंडी ग्रामपंचायतवर सरपंचपदी पतीची तर उपसरपंचपदी पत्नीची निवड झाली आहे. आब्दीमंडीच्या सरपंचपदी साबेर खान पठाण यांची तर उपसरपंचपदी शगुफ्ता साबेर पठाण यांची निवड करण्यात आली आहे.

पती पत्नीची बिनविरोध निवड

विशेष म्हणजे या दोघांच्या विरोधात कुणाचाही अर्ज दाखल झाला नसल्यामुळे या पती पत्नीची बिनविरोध निवड करण्यात आली. आता यापुढे आब्दीमंडी गावाचा कारभार पती पत्नी खांद्याला खांदा लावून करणार आहेत.

पतीला असणारी राजकारण आणि समाजकारणाची आवड, घरीदारी संसारातही केवळ राजकारणाच्या गप्पा सतत ऐकायला मिळणारी ‘ती’, आज आपल्या पतीराजांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणातील अर्धांगिनी बनली

पुण्यात सहचारिणीचा सह’विजय’

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. 3 मधून एका जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर दोन जागांसाठी लढत झाली. विशेष म्हणजे या प्रभागातून महेश जयवंत शेळके आणि प्रियांका महेश शेळके हे पतीपत्नी विजयी झाले आहेत. एकाच प्रभागातून पती-पत्नी निवडणूक लढवून विजयी होणारं हे पुणे जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण आहे. (Aurangabad Aabdimandi Gram Panchayat Husband Wife Sarpanch)

पतीला खांद्यावर उचलून जल्लोष

निवडणुकीत उमेदवार जिंकला की कार्यकर्ते त्याला खांद्यावर उचलताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीत पती निवडून आल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी रेणुका गुरव यांनी चक्क पतीलाच खांद्यावर घेत मिरवणूक काढली होती.

पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. पतीने इतकं मोठं यश मिळवल्याने पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.

संबंधित बातम्या :

Gram Panchayat Election 2021 Result | माझा कारभारी लय भारी!

सहचारिणीचा सह’विजय’, पुण्यात शेळके दाम्पत्याची ग्रामपंचायतीत बाजी

सरपंच पती, प्रशासक पत्नी, ग्रामपंचायत बरखास्तीवर मुश्रीफ यांचा तोडगा

(Aurangabad Aabdimandi Gram Panchayat Husband Wife Sarpanch)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.