Aurangabad | भागीदारीच्या अमिषाने 6 कोटींना गंडा घालणारा अखेर गजाआड, छत्तीसगडमधून अटक!
2015 मध्ये अनिल रायवर शहरातील एमआयडीसी सिडको व सिडको ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर 30 पेक्षा जास्त चेक बाउन्सची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
औरंगाबाद | वाळूज परिसरातील ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया प्रा. लि. कंपनीची स्थापना करून भागीदारीचे आमिष दाखवत 6 कोटी 78 लाखांची फसवणूक (Fraud) करून फरार झालेल्या आरोपीला पाच वर्षानंतर बेड्या (Accused arrested ) ठोकण्यात आल्याआहेत. अनिल राजदयाल राय (Anil Rajdayal Rai) असे या आरोपीचे नाव असून छत्तीसगड येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्तीसगडमध्येही 70 लाखांची फसवणूक करून फळून जाण्याच्या बेतात असलेल्या अनिलला भिलाई पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी विमानतळाच्या वेटिंग रुममधून अटक केली. बुधवारी त्याला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोण आहे अनिल राजदयाल राय?
राजस्थानमधून आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रायने अनेक राज्यांत ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया कंपनी स्थापन केली. 2017 मध्ये त्याने वाळूजला कंपनी सुरु करून रेल्वे सीटसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करत असल्याचे सांगितले. सोनालिका मेटक कॉर्पोरेशनचे देवराम चौधरींसोबत ओळख झाली. अनिल राय याने त्यांच्याकडून स्टीलची खरेदी केली. पण पैसे दिले नाहीत. चौधरी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर रायने ऑर्बिट कंपनीत 50 टक्के भागीदारी आणि 1.25 लाखांचे शेअर्स देण्याचे आश्वासन दिले. त्यांना आणि पत्नीला कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त केले. मात्र काही दिवसात दोघांनाही मंडळावरून काढले. त्याआधी त्याने कोऱ्या लेटरपॅडवर आणि चेकवर चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्यानंतर चौधरी यांच्या नावे असलेले 35 लाखांचे शेअर्स स्वतःच्या नावे करून स्टील साहित्याचे 6 कोटी 43 लाख रुपये घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखा तपास करत होती.
30 पेक्षा जास्त चेक बाऊन्सची प्रकरणं
2015 मध्ये अनिल रायवर शहरातील एमआयडीसी सिडको व सिडको ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर 30 पेक्षा जास्त चेक बाउन्सची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. चाणक्य पुरीतील त्याचे घर बँकेने जप्त केले आहे. वर्षभरापासून आर्थिक गुन्हे शाखा अनिल रायच्या शोधात होती. मोबाइल सीडीआरवरून तो छत्तीगडच्या भिलाई येथे असल्याचे दिसले. त्यावरून भिलाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा राय हा दोन फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असून सध्या भिलाईच्या दुर्ग मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाली होती.
इतर बातम्या-