गोदावरी नदीपात्रात फटफटी गँगचा धुमाकूळ, वाळू उपशामुळे मोक्षघाटास नुकसान होण्याची शक्यता

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे फटफटी गँगने धुमाकूळ घातला असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जात आहे. वाळूउपसा अवैधरित्या होत असून येथील प्रशासन अजूनही गप्प आहे.

गोदावरी नदीपात्रात फटफटी गँगचा धुमाकूळ, वाळू उपशामुळे मोक्षघाटास नुकसान होण्याची शक्यता
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 10:22 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता वाळू माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे फटफटी गँगने धुमाकूळ घातला असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. या भागात वाळूउपसा अवैधरित्या होत असून येथील प्रशासन अजूनही गप्प आहे. (Aurangabad administration not taking any action against sand mafia who mining sand from Paithan Godavari river)

मोक्षघाटास नुकसान होण्याची शक्यता

औरंगाबादेतील पैठण तालुक्यात वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातोय. येथे फटफटी गँगने धुमाकूळ घातला असून त्यांच्यावर कोणाचाही धाक राहिलेला नाही. या गँगकडून मागील काही दिवसांपासून पैठणमध्ये गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातोय. श्री संत एकनाथ महाराज मंदिराच्या मागे हा वाळू उपसा केला जात आहे. अवैधरित्या केल्या जात असलेल्या वाळू उपशामुळे येथील नाथ मंदिराच्या मोक्षघाटास नुकसान पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून गोदावरी नदीमधून वाळूचा उपसा केला जातोय. हा प्रकार अनेकवेळा समोर आला असला तरी अजूनही त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाहीये. येथील प्रशासन अजूनही गप्प आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाळू उपशावर वेळीच नियंत्रण घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जालन्यात वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला

जालन्यातील जाफराबादेत वाळू माफियांची गुंडगिरी फोफावली आहे. पैशांच्या लोभापाई त्यांच्यातला माणूस हरवलाय आणि हैवानाने जन्म घेतलाय. त्यांनी शुक्रवारी (11 जून) थेट पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन सात ते आठ जणांनी पत्रकाराला जीवघेणी मारहाण केली. विशेष म्हणजे जाफराबादेत भर रस्त्यात पंचायत समितीसमोर वाळू माफियांनी पत्रकाराला मारहाण केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मारहाणीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

नरडं कापून ठेवेन एकेकाचं, साताऱ्यात भाजप नगरसेविकेची ऑडिओ क्लिप, उदयनराजे म्हणतात…

(Aurangabad administration not taking any action against sand mafia who mining sand from Paithan Godavari river)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.