Aurangabad | धक्कादायक… औरंगाबादेत सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, कन्नडच्या विठ्ठलवाडी गावावर शोककळा

औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरु आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची गर्दी लोटली आहे. मात्र आलेल्या तरुणांना राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची सोय नाही.

Aurangabad | धक्कादायक... औरंगाबादेत सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, कन्नडच्या विठ्ठलवाडी गावावर शोककळा
औरंगाबादमध्ये सैन्यभरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 5:00 PM

औरंगाबादः औरंगाबाद शहरातून (Aurangabad city) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अग्नीवीर (Adniveer) सैन्य भरती दरम्यान शहरात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या भरतीदरम्यान तरुणांची फिटनेस टेस्ट घेतली जाते. यावेळी रनिंग करताना एका तरुणाला चक्कर आली. धावपट्टीवरच तरूण खाली कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा कन्नड तालुक्यातून आला होता. मात्र सैन्यात भरती होण्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली. या प्रकारामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये काही वेळ घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.

काय घडली घटना?

औरंगाबादेत विद्यापीठ ग्राउंडवर सध्या अग्नीवीर सैन्य भरती सुरु आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाची भरतीदरम्यान रनिंग सुरु होती. 1600 मीटर रनिंग करताना या तरुणाला चक्कर आली. कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील हा तरुण होता. 20 वर्षीय या तरुणाचं नाव करण पवार असं होत. रनिंग करताना अचानक कोसळल्याने त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अग्नीवीरांची गैरसोय

औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरु आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची गर्दी लोटली आहे. मात्र आलेल्या तरुणांना राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची सोय नाही. हे तरुण रस्त्यावर किंवा मिळेल तिथे आडोसा पाहून झोपत आहेत. अशा प्रकारे रात्र काढल्यानंतर तरुणांना भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच अग्नीवीरांच्या अशा गैरसोयीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. आज रनिंग करताना तरुणाचा असा एकाएकी मृत्यू झाल्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय ठरले, हे तपासले जावे, अशी मागणी केली जात आहे…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.