वकिलाला जात पाहून रो हाऊस नाकारणाऱ्या बिल्डरचे लायसन्स रद्द करा, RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी

रो हाऊस पाहण्यासाठी गेलेल्या एका वकिलाला दलित असल्याच्या कारणावरून घर नाकारण्यात आल्याची तक्रार औरंगाबादेत करण्यात आली आहे. असा बिल्डरचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी आता RPI (खरात) कडून करण्यात आली आहे.

वकिलाला जात पाहून रो हाऊस नाकारणाऱ्या बिल्डरचे लायसन्स रद्द करा, RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी
सचिन खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 3:11 PM

औरंगाबादः चिकलठाणा या भागात अनुसूचित वकिलाला जात पाहून घर देण्याचे नाकारले हा संविधानाचा आणि कायद्याचा अपमान आहे, अशा बिल्डरचे लायसन्स रद्द करून त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चिकलठाणा परिसरात घर पहायला गेलेल्या वकिलाबाबत हा प्रकार घडला होता. अनुसूचित जातीचा असल्यामुळे रो हाऊस दाखवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप सदर वकिलांनी केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वकील महेंद्र गंडले यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

काय घडला नेमका प्रकार?

या प्रकरणी अ‍ॅड. महेंद्र गंडले यांनी तक्रार दाखल केली आहे. महेंद्र यांनी टीव्ही9च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ते 7 जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री गुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यानंतर त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांना त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गंडले यांना जात विचारली. अ‍ॅड. गंडले यांनी अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या मजातीच्या लोकांना घर देता येणार नाही, असे त्याने सांगितले. तसेच त्यानंतर त्यांनी बिल्डरचे कार्यलय गाठून घराची चौकशी केली, तिथेही मला जात विचारून घर नाकारण्यात आल्याचे अ‍ॅड. गंडले यांनी सांगितले.

बिल्डरचे लायसन्स रद्द करण्याची मागणी!

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. अशा जातीवादी लोकांच्या मनात जातीवाद कायम असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संबधित बिल्डरचे लायसन्स रद्द करावे. त्यांना औरंगाबाद या जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी महाविकासआघाडीचा घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Aurangabad: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, औरंगाबादेत चाललंय काय?

कोरोना रुग्णांना अतिरिक्त बिल लावणाऱ्या हॉस्पिटल्सना नोटिसा, औरंगाबाद महापालिकेची कारवाई!

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.