औरंगाबादः जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत (Soygaon Nagar panchayat) शिवसेनेने भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यात सत्तारांची सरशी झाली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक जबर धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले. नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील 6 पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.
यंदाची सोयगान नगरपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिवसेना आमने-सामने होती. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणुकी प्रतिष्ठेची ठरली होती. अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने बहुमत मिळवून दानवे यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आणखी डावपेच आखून भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेकडे वळवले. या चार नगरसेवकांचा आता औपचारिक प्रवेश झाला असून लवकरच ही प्रक्रिया अधिकृत होईल.
सोयगाव निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उर्वरीत दोन नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हे सदस्यदेखील शिवसेनेत आल्यास भाजपचे संख्याबळ शून्यावर पोहोचू शकते. भाजपसाठी आणि पर्यायाने दानवेंसाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते.
इतर बातम्या-