PHOTO | डॉ. भागवत कराडांची औरंगाबादेत राजकीय जुळवाजुळव, दलित पँथर नेते संजय जगताप यांच्या घरी न्याहरी
भाजपच्या वतीने आमदार अतुल सावे यांच्यासह डॉक्टर भागवत कराड आणि शहराध्यक्ष संजय केनेकर यांना महापालिका निवडणुकीत अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याच्या कामाला डॉ. कराड लागले आहेत.
औरंगाबाद भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचे रूपांतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad municipal corporation) निवडणुकीत करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत दोन वेळा महापौर राहिलेले भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी दलित मतांची वज्रमूठ बांधण्यासाठी आता न्याहारी डिप्लोमसीचा आधार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील त्यांच्या वास्तव्यात दररोज एका नेत्याच्या घरी सकाळी जाऊन न्याहारी करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. मित्रपक्ष असलेला शिवसेना दूर जात असताना त्याची पोकळी भरून काढण्यासाठी विविध दलित संघटनांना सोबत घेण्यासंबंधीची चाचपणी केली जात आहे. शनिवारी डॉक्टर कराड यांनी दलित पँथर चे नेते माजी नगरसेवक संजय जगताप यांच्या निवासस्थानी आपल्या लव्याजम्या यासह सह भेट घेत तेथे न्याहारी केली.
विविध नेत्यांच्या भेटीगाठी
शनिवार आणि रविवार रोजी दिल्लीहून औरंगाबाद येथे आल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड भाजपमधील पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटना व नेत्यांच्या भेटीगाठीवर भर देत आहे . यामाध्यमातून डॉक्टर कराड महापालिका निवडणुकीसाठी रणनीती तयार करीत असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त भेट दिली.त्यावेळी त्यांनी शहरातील महापालिका निवडणुकीसंबंधीची रणनीती जाहीर केल्याचे सूत्रांकडून समजते.
महापालिकेच्या रणनीतीला वेग
भाजपच्या वतीने आमदार अतुल सावे यांच्यासह डॉक्टर भागवत कराड आणि शहराध्यक्ष संजय केनेकर यांना महापालिका निवडणुकीत अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याच्या कामाला डॉ. कराड लागले आहेत. डॉक्टर कराड महापालिकेत एक वेळ उपमहापौर आणि दोन वेळा महापौर राहिल्याने त्यांना महापालिकेचे राजकारण चांगलेच अवगत आहे. विविध दलित संघटना तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना डॉक्टर कराड यांनी आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळातआपल्या बाजूने करण्यात यश मिळविले होते.
शनिवार 12 मार्च रोजी डॉक्टर कराड यांनी दलित पँथर चे नेते संजय जगताप यांच्या निवासस्थानी सकाळी भेट दिली या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील आठवले रिपाई गटाचे शहराध्यक्ष किशोर थोरात कामगार शक्ती संघटनेचे तसेच आंबेडकर कृती समितीचे निमंत्रक गौतम खरात भाजपचे नेते जालिंदर शेंडगे राजू शिंदे दलित पँथर चे जिल्हाध्यक्ष कडुबा गवळे, श्याम भारसाखळे, पंकज भारसाखळे, हसन भाई, जगन जगताप, भाजपचे माजी महापौर बापू घडामोडे ,बबनराव नरोडे अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेले सुभाष पाटील आदींची उपस्थिती होती
इतर बातम्या-