Aurangabad | मराठवाडा दणाणून सोडणाऱ्या भाजपच्या मोर्चात पंकजा मुंडेंना साधं निमंत्रणही नसावं, पक्षात कुरघोडीचा प्रकार?

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच 2013 साली स्व. गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या पाणी मोर्चाची आठवण यावेळी करून दिली. मात्र या मोर्चात पंकजा मुंडेंना सपशेल डावलण्यात आल्याचं दिसून आलं.

Aurangabad | मराठवाडा दणाणून सोडणाऱ्या भाजपच्या मोर्चात पंकजा मुंडेंना साधं निमंत्रणही नसावं, पक्षात कुरघोडीचा प्रकार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 2:20 PM

औरंगाबादः हजारो औरंगाबादकरांच्या जल आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी भाजपच्या वतीनं काल विराट मोर्चा काढण्यात आला. खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. सत्ताधारी शिवसेना, राज्यातल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारलाही पोटात गोळा यावा, एवढं मोठं हे शक्तीप्रदर्शन  ठरलं. पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भाजप संघर्ष करतच राहणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. औरंगाबाद भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जालन्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार अतुल सावे आणि शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी या मोर्चासाठी परिश्रम घेतले. मात्र मराठवाड्यातील भाजपचा महत्त्वाचा चेहरा या गर्दीत नव्हता. तो म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा. औरंगाबादच्या जलाक्रोश मोर्चाचं साधं निमंत्रणही पंकजांना नव्हतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षांतर्गत कुरघोडी?

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. 2019 मध्ये ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असं पंकजांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलं होतं.डॉ. कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागली तेव्हा पंकजांना डावलण्यात आलं. पुढे मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडेंना डावलण्यात आलं. त्यावेळी पंकजा मुंडेंची नाराजी स्पष्टी दिसून आली, पण त्यांनी ती कधीच जाहीर केली नाही. देवेंद्र फडणवीस हे पक्षातील सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्याशी थेट विरोध घेणं त्यांना परवडणारंही नाही. औरंगाबादच्या मोर्चाची जबाबदारी डॉ. कराड, रावसाहेब दानवे आणि संजय केणेकरांनी घेतली होती. फडणवीसांना दुखावू नये, यासाठी पंकजा मुंडेंना या मोर्चाचं साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही, असं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

जळगावचे गिरीश महाजन आले…

एकिकडे मराठवाड्यातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या पंकजा मुंडे औरंगाबादच्या मोर्चात गैरहजर होत्या. तर दुसरीकडे जळगावचे गिरीश महाजन हे मंचावर दिसून आले. याबद्दल गिरीश महाजनांना विचारले असता, मी स्वतःहून मोर्चा कसा आहे, हे पाहण्यासाठी आलोय (मला निमंत्रण नव्हतं…), अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली.

मुंडेंची आठवण, पण पंकजांना डावललं

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 2013 साली स्व. गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या पाणी मोर्चाची आठवण करून दिली. त्यावेळच्या मोर्चानंतर राज्यात सत्ताबदल झाला. तसाच बदल औरंगाबादेत होईल, असं फडणवीस म्हणाले. मात्र मुंडेंची आठवण काढूनही या मोर्चात पंकजा मुंडेंना सपशेल डावलण्यात आल्याचं दिसून आलं.

राष्ट्रीय राजकारणात सक्रिय?

2019 मध्ये विधानसभा निवडणूकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्यासमोर पराभूत झाल्यानंतर राज्यातील राजकारणात किंवा सार्वजनिक कार्यक्रम, सभा संमेलनांमध्ये पंकजा मुंडे फार सक्रिय दिसल्या नाहीत. याउलट राष्ट्रीय राजकारणात त्या जास्त सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत. नुकतीच त्यांनी जयपूर येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत हजेरी लावली.

2020 मध्ये पंकजांचं उपोषणही गाजलं

27 जानेवारी 2020 रोजी उद्धव ठाकरे सरकारविरोधात मराठवाड्यातील पाणी प्रश्नी पंकजा मुंडे यांनी एका  दिवसाचं लाक्षणिक उपोषण औरंगाबादमध्ये केलं होतं. या उपोषणाचीही महाराष्ट्रात चांगलीच चर्चा झाली होती. मात्र औरंगाबादच्या या मोर्चात पंकजांना नामोल्लेखही न करणं ही पक्षांतर्गत कुरघोडीच तर म्हणावी लागेल.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...