Aurangabad | औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कोरोनाची लागण, शुक्रवारनंतर जाणवू लागली लक्षणं
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांना अंगदुखी आणि ताप जाणवू लागला. तापसण्यानंतर शनिवारी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले.
औरंगाबादः गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून सुनील चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवत होते. कोरोनाची (Corona) लक्षणे जाणवल्यामुळे त्यांनी खबरदारी घेत त्यांनी आधी तपासणी करून घेतली. वैद्यकीय तपासण्याअंती त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनचा (Home Quarantine) सल्ला दिला आहे. सध्या ते विलगीकरणात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुनील चव्हाण यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली. चव्हाण यांना डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपली सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्रीपासूनच लक्षणं
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांना अंगदुखी आणि ताप जाणवू लागला. तापसण्यानंतर शनिवारी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले. रविवारपासून ते पूर्णपणे विश्रांती घेत आहेत. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच काही लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सुनील चव्हाण यांनी केले आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जास्तीत जास्त रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.