Aurangabad| महापालिकेचं पहिलं आधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच!! बांधकाम सुरू, वर्षभरात इमारत पूर्ण होणार!

60+ खाटांचे रुग्णालय 9.31 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. साइटचे क्षेत्रफळ 35,500 चौरस फूट आहे आणि 25,000 चौरस फूट क्षेत्रफळावर (G+2) इमारत बांधली जाणार आहे.

Aurangabad| महापालिकेचं पहिलं आधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच!! बांधकाम सुरू, वर्षभरात इमारत पूर्ण होणार!
मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे प्रस्तावित चित्र Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 12:29 PM

औरंगाबादः औरंगाबाद स्मार्ट सिटी (Smart city) डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ए एस सी डी सी एल)तर्फे स्मार्ट हेल्थ प्रोजेक्ट अंतर्गत लवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (Multispecialty Hospital) उभारले जाणार आहे. हुडको एन-11 परिसरात आधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास सुरुवात केली आहे. स्मार्ट सिटी या प्रकल्पांतर्गत 4 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधून ते संचलनासाठी औरंगाबाद महापालिकेकडे (Aurangabad municipal Corporation) सुपूर्द करेल. औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारला जात आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सुचविलेल्या या प्रकल्पाला औरंगाबाद स्मार्ट सिटी बोर्डाने मार्चमध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटीने निविदा प्रक्रिया पार पाडून योग्य एजन्सीला कार्यादेश जारी केले. स्मार्ट हेल्थ प्रकल्प 33.48 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत आहे.

हॉस्पिटलची वैशिष्ट्य काय?

या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणार्‍या 4 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपैकी पहिले हॉस्पिटल हे ताठे मंगल कार्यालयाजवळ हडको एन-11 मध्ये आहे. 60+ खाटांचे रुग्णालय 9.31 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. साइटचे क्षेत्रफळ 35,500 चौरस फूट आहे आणि 25,000 चौरस फूट क्षेत्रफळावर (G+2) इमारत बांधली जाणार आहे. तळमजल्यावर ओपीडी कक्ष किंवा डॉक्टर सल्ला कक्ष, आपत्कालीन रूग्णांसाठी 6 खाटा असलेले अपघात क्षेत्र, प्रशासन-सह-नोंदणी ब्लॉक, औषध ची दुकान, सीटी स्कॅन कक्ष, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि एक्स-रे सेंटर यांचा समावेश असेल. पहिल्या मजल्यावर स्त्री-पुरुष रुग्णांसाठी सामान्य वॉर्ड, मोठे आणि लहान ऑपरेशन थिएटर असतील. तर दुसऱ्या मजल्यावर निवासी डॉक्टरांसाठी विश्राम गृह, आयसीयू, विशेष खोल्या आणि कॅन्टीन असतील.

पर्यावरणपूरक डिझाइन

स्मार्ट सिटी चे अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे आणि महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या देखरेखीखाली प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान हे हा प्रकल्प राबवत आहे. स्मार्ट सिटी पॅनेल मध्ये असलेले वास्तुविशारदांपैकी एक असल्याने, डिझाईन ब्युरोचे आर्किटेक्ट हरेस सिद्दीकी यांची स्मार्ट हेल्थसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या इमारतिच्या बांधकामात अग्निसुरक्षेच्या अत्याधुनिक मानकांचे पालन होईल. हे मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टीम (MGPS) ने सुसज्ज असेल आणि पर्यावरणपूरक डिझाइनमध्ये तयार केल्याप्रमाणे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार आहे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.