ये झिरो अच्छा है… Aurangabad मध्ये दोन वर्षानंतर प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शून्यावर, निर्बंधांचं काय?

रुग्णसंख्या घटली तरीही लसीकरण अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेतली. यात महापालिकेचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. यावेळी लसीकरण वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यायचे ठरले आहे.

ये झिरो अच्छा है... Aurangabad मध्ये दोन वर्षानंतर प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शून्यावर, निर्बंधांचं काय?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 10:58 AM

औरंगाबादः मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याने (Aurangabad district) कोरोनाच्या रुग्णसंख्येत अफाट वाढ आणि त्यानंतर हळू हळू घट अनुभवली. चांगली बातमी म्हणजे दोन वर्षात प्रथमच 21 मार्च रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोनाचा रुग्ण (Corona Patients) आढळला नाही. 15 मार्च 2020 रोजी औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 741 रुग्ण दाखल झाले असून 1 लाख 65 हजार 981 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 732 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शून्यावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील निर्बंधांचे काय?

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी शून्यावर येऊन ठेपली. तसेच मागील काही दिवसांमध्ये रुग्णांचे प्रमाणही अत्यंत कमी गणले गेले. तरीही राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांत कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे. लसीचा पहिला डोस 90 टक्के आणि दुसरा डोस 70 टक्के लोकांनी घेतला तरच जिल्हा निर्बंधमुक्त होईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. आता रुग्ण संख्या कमी करण्यापेक्षा दुसरा डोस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, याकडेच लक्ष दिले जाईल. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

निर्बंध उठण्यासाठी आणखी 12 % ची प्रतीक्षा

शहरात कोरोना लसीकरण न केलेल्या नागरिकांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. लसीचे डोस न घेतलेल्यांना पेट्रोल, रेशन देऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र नागरिकांकडून या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. आतापर्यंत केवळ 58 टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. यात आणखी 12% वाढ झाली तरच औरंगाबाद जिल्हा निर्बंधमुक्त होऊ शकेल.

जनजागृतीसाठी मोहीम हाती घेणार

रुग्णसंख्या घटली तरीही लसीकरण अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेतली. यात महापालिकेचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. यावेळी लसीकरण वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यायचे ठरले आहे. त्यामुळे विधिमंडळ, लोकसभेच्या अधिवेशनानंतर सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, इतर नेत्यांची मदत घेऊन जनजागृती केली जाईल. वॉर्ड, आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणाची आकडेवारी, स्थिती लोकांना समजून सांगितली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, मनसेच्या अमेय खोपकरांची टीका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.