विषप्राशन केलेले दीर-भावजय, भर रस्त्यात घट्ट मिठी, जालना रोडवर अखेर तडफडत कोसळले, औरंगाबादेत काय घडलं?
सदर युगुल करमाड येथील रोडवर आल्यानंतर त्यांना विषप्राशन केल्यामुळे झटके येत होते. उलट्यांचा त्रासही होऊ लागला. त्यामुळे परिसरात विषारी दर्पही पसरला होता.
औरंगाबादः जिल्ह्यातील जालना रोडवर करमाड (Karmad) परिसरात एक धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. ऐन सायंकाळी पाच वाजण्याची वेळ होती. करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिल्डिंगसमोर विष प्राशन केलेले एक प्रेमी जोडपे आले. चालताना दोघांचेही झोक जात होते. विष प्राशन केल्याने (Suicide case)चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही क्षणांत खाली कोसळले. हात-पाय तडफडत होते. दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. एकदम कोसळल्याने दोघांचेही मोबाइल बाजूलाच पडलेले. परिसरातील नागरिकांनी या दोघांची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना (Aurangabad police) आणि रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित केलं. जमलेल्या नागरिकांनी सांगितलेली ही आपबिती अतिशय धक्कादायक आहे.
कोण होते दोघे?
करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडलेल्या या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तसेच त्यांचे मोबाइलही पोलिसांच्या हाती सोपवले. त्यावरून पुढील माहिती काढण्यात आली. हे दोघे दीर-भावजय असल्यांचं पोलिसांनी सांगितलं. करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वीच सदर महिला सत्यभामा कदम ही तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. सत्यभामा कदम ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या. दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला. तेव्हापासून सत्यभामा यांचा पोलीस शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वाहनचालक आणि गृहिणी
या घटनेतील तरुण काकासाहेब कदम हे शेती करून मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर सत्यभामा कदम या गृहिणी होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले असा परिवार होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल हे सदर घटनेचा पुढील तपास करीत आहे.
विष प्राशन व उलट्यांनी परिसरात दर्प
सदर युगुल करमाड येथील रोडवर आल्यानंतर त्यांना विषप्राशन केल्यामुळे झटके येत होते. उलट्यांचा त्रासही होऊ लागला. त्यामुळे परिसरात विषारी दर्पही पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंह जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. शेख अनिस हे तत्काळ 108 ची रुग्णवाहिका घेऊ घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही तत्काळ चिकलठाणा येथील मिनी घाटीत नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
इतर बातम्या-