कश्यप गँगसारख्या टोळ्या संपवू, गुंडगिरी खपवून घेऊ नका, 112 वर कळवा, औरंगाबाद पोलीस अ‍ॅक्टिव्ह मोडवर!

| Updated on: Feb 11, 2022 | 12:34 PM

युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनीही पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना याविषयी निवेदन दिले होते. यावर पोलीस आयुक्तांनी त्वरीत कारवाई करत या परिसरातील नागरिकांना गुंड त्रास देत असतील तर आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करू, अशा सूचना दिल्या आहेत.

कश्यप गँगसारख्या टोळ्या संपवू, गुंडगिरी खपवून घेऊ नका, 112 वर कळवा, औरंगाबाद पोलीस अ‍ॅक्टिव्ह मोडवर!
कश्यप गँगसारख्या टोळ्या शहरातून संपवण्याचे पोलीस आयुक्तांचे आश्वासन
Follow us on

औरंगाबादः शहरातील पुंडलिक नगर, हनुमान नगर भागात गुंड दुर्लभ कश्यप (Kashyap gang) याचं अनुकरण करत गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांनी दहशत माजवल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांनी लावून धरल्या. या भागातील गुंडांनी MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर क्षुल्लक कारणासाठी तलवारी, चाकू आणि फायटरने गंभीर वार केले. तत्पूर्वी यातील काही गुंड एका लग्नात नंग्या तलवारी घेऊन डान्स करताना आढळले होते. या भागात अशा गुंडांची (Aurangabad crime) दहशत असून सामान्य नागरिक, महिला आणि मुलींना येथे राहणे कठीण जात होते. मात्र पोलीस प्रशासन कठोर पाऊले उचलत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. या सर्व प्रकारांची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून याच भागात नव्हे तर शहरातील कोणत्याही भागात गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तयार होत असतील तर पोलिसांना त्वरीत याची माहिती कळला. अवघ्या काही तासात अशा गुंडांवर लगाम घातला जाईल. कश्यप गँगसारख्या टोळ्या औरंगाबादेत वाढणार नाहीत, त्यांना वेळीच संपवून टाकू, अशी ग्वाही पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Dr. Nikhil Gupta) यांनी नागरिकांना दिली आहे. तसेच पुंडलिक नगरातील गुन्हेगारांचा परिसर पोलिसांनी तसेच दामिनी पथकानेही पिंजून काढावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पाच दिवसांपूर्वीच गुंडांचा हैदोस

उज्जैन येथील गुंड दुर्लभ कश्यपचे फॉलोअर्स म्हणवणाऱ्या तरुणांची गुंडगिरी गेल्या काही दिवसांपासून पुंडलिक नगर भागात वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. या टोळक्याने पाच दिवसांपूर्वीच एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, आतिश मोरे, शेख बादशाह, नीलेश धस, पिण्या खडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली असली तरीही शहरात भर दिवसा असे गुंड दादागिरी करत फिरत असताना पोलीस कारवाई कशी करत नाहीत, असा सवाल विचारला जात होता. युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनीही पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना याविषयी निवेदन दिले होते. यावर पोलीस आयुक्तांनी त्वरीत कारवाई करत या परिसरातील नागरिकांना गुंड त्रास देत असतील तर आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करू, अशा सूचना दिल्या आहेत.

पोलिस आयुक्तांच्या सूचना काय?

– शहरातील कोणत्याही भागात असे गुंड त्रास देत असल्यास नागरिकांनी 112 या हेल्पलाइन क्रमांकवर कळवावे. काही तासात पोलीस तेथे हजर होतील, असे आश्वासन पोलीस आय़ुक्तांनी दिले आहे.
– दामिनी पथकाला पुंडलिक नगर परिसरात गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– काल राजनगर, हनुमान नगरमध्ये दामिनी पथकाने तरुणी, महिलांशी संवाद साधला. आज प्रथमच पोलीस या भागात गस्त घालत असल्याचे पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रिया येथील महिला व तरुणींनी दिली.
– काही गुंडांचा रेकॉर्ड पाहता, त्यांच्यावरील कारवाईत मी स्वतः जातीने लक्ष देईल, असे आश्वासन डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले.

इतर बातम्या-

कपाळाला आडवं गंध, खांद्यावर रुमाल, उज्जैनच्या गुंडाचे फॉलोअर्स औरंगाबादेत, कोण आहे दुर्लभ कश्यप?

औरंगाबाद | चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाण पुलाच्या DPR ला मंजुरी, मंत्री नितीन गडकरींशी आणखी कोणत्या प्रकल्पांवर चर्चा?

औरंगाबादः आता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाचे रुपडे पालटणार, नूतनीकरणासाठी किती होणार खर्च?