सावत्र मामाचा भाचीवर अत्याचार! त्रासानं रडत असलेल्या मुलीनं आजीला सांगितलं, ‘मामाने 3 वेळा…’

Aurangabad crime : काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. तेव्हा त्यांनं आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला.

सावत्र मामाचा भाचीवर अत्याचार! त्रासानं रडत असलेल्या मुलीनं आजीला सांगितलं, 'मामाने 3 वेळा...'
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 11:41 AM

औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad Crime) एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) तिच्या सावत्र मामानं सतत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीनं पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपास केला जातो आहे. या संपातजनक घटनेनं औरंगाबाद हादरुन गेलं आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस (Usmanpur Police, Aurangabad) ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र मामानं अत्याचार केले. तीन वेळ सतत अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित मुलगी अत्याचारानंतर झालेल्या त्रासामुळे विव्हळत होती. तिचं रडणं पाहून मुलीच्या वडिलांनी तिला आजीकडे जाण्यास सांगितलं. तेव्हा ही सगळा खळबळजनक प्रकार मुलीनं आपल्या आजीला आणि सावत्र भावाला सांगितला. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेच्या आजीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि सावत्र मामाविरोधात तक्रार दाखळ केली.

तीन वेळा अत्याचार

सावत्र मामानं आपल्याच तेरा वर्षांच्या भाजीवर तीन वेळा अत्याचार केला. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली. उस्मानपुरा पोलिसांनी या खळबळजनक घटनेप्रकरणी माहिती दिली आहे.

उस्मानपुरामध्ये एक व्यक्ती कुटुंबासोबत राहत होती. या व्यक्तीला चार पत्नी होत्या. दोघा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आणि एक पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून या इसमाला दोन मुलं तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली झाल्या.

अशी आली घटना उघडकीस

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. तेव्हा त्यांनं आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला. 13 वर्षांच्या चिमुरडीवर त्यानं जबरदस्तीनं तीन वेळा अत्याचार केला. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीनं कुणालाच काही सांगितलं नाही. पण झालेल्या त्रासामुळे तिला रडू आवरत नव्हतं. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मुलगी सतत रडतेय हे पाहून वडिलांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलास बोलावून घेतलं आणि तिला आजीकडे घेऊन जायला सांगितलं.

मामा फरार

आजीकडे जाताना पीडितेनं आपल्या सावत्र भावाला घडलेला सगळा प्रसंग सांगितलं आणि आजीलाही सगली घटना घरी पोहोचल्यावर सांगितली. त्यानंतर या मुलीच्या आजीने आणि काकांनी पोलीस स्थानक गाठलं आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली. दरम्यान, सध्या या पीडित मुलीवर अत्याचार करणारा तिचा सावत्र मामा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.