Aurangabad | एकिकडे कव्वाली तर दुसरीकडे घुमतात भजनाचे सूर, दौलताबादचा चांद बोधले महाराजांचा दर्गा ऐक्याचं प्रतीक
समाजातील नागरिकांनी ठरवलं तर त्यांच्यातील ऐक्य भंग करण्याची हिंमत इतर कोणत्याही शक्ती करणार नाहीत. शांतता भंग करणाऱ्यांसाठी ही एक चपराक ठरेल.
औरंगाबाद : राज्यात एकिकडे मशीदीवरचे भोंगे उतरवा आणि हनुमान चालीसाचे (HanumanChalisa) पठण करा, असे आवाहन करत जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या (Political leader) आक्रमक वक्तव्यांमुळे कधीही सामाजिक शांतता (Social Peace) भंग होण्याची चिन्ह आहेत. पण अशा वातावरणातही दौऔरंगाबाद जिल्ह्यातीललताबाद शहरात हिंदू-मुस्लीम वादाला फाटा देत एका दर्ग्यात एकिकडे कव्वाली तर दर्ग्यातील समाधीच्या दुसऱ्या बाजूला हिंदू बांधवांनी भजनदेखील म्हटलं. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला हा अप्रतिम सोहळा संत हजरत चांद बोधले महाराजांच्या कबरीवर गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे जे द्वेषाचं वातवरण निर्माण केलं जातंय, त्या परिस्थितीला सडेतोड उत्तर देणाराच हा सोहळा आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक
देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या बाजूला शाही हमामच्या मागे चांद बोधले यांचा दर्गा आहे. चांद बोधले यांचे शिष्य संत नार्दन स्वामी यांनी हा दर्गा बांधला आहे. चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला हातो. रमजानच्या पवित्र महिन्याच्या तेराव्या उपवासाला या दर्ग्यात भजनांसमोबत कव्वालीदेखील दायली जाते. त्यामुळेच हा दर्गा हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो.
Aurangabad | हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. दौलताबादमधील चांद बोधले महाराजांचा दर्गा pic.twitter.com/iwlPILIdQm
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2022
शांतता भंग करणाऱ्यांसाठी चपराक
आज हनुमान जयंती आणि सध्या सुरु असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर अनेक जण सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. पण समाजातील नागरिकांनी ठरवलं तर त्यांच्यातील ऐक्य भंग करण्याची हिंमत इतर कोणत्याही शक्ती करणार नाहीत. शांतता भंग करणाऱ्यांसाठी ही एक चपराक ठरेल.
इतर बातम्या-