Aurangabad | जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाची बाजी, दिलीप निरफळ यांची निवड!
भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आता उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली होती. त्याचेही चित्र आज शनिवारी स्पष्ट झाले.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्ष (Aurangabad Milk Association ) पदासाठीची चुरशीची लढत आज पार पडली. शिवसेनेचे दोन मंत्री या लढाईत आमने सामने होते. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) या दोघांनाही आपल्याच गटातील माणूस या पदावर बसवण्याची इच्छा होती. आज या संदर्भातला निर्णय होणार असल्याने सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरु होते. उपाध्यक्षपदी भुमरे (Sandipan Bhumre) गटातील व्यक्तीची निवड होते की सत्तार यांच्या गटातील व्यक्तीला स्थान मिळते, याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दूध संघाच्या अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्ष पद निवडीची प्रक्रिया अधिक उत्कंठावर्धक झाली. अखेर आज संदीपान भुमरे गटातील व्यक्तीची निवड झाली असून दिलीप निरफळ हे औरंगाबाद दूध संघाचे नवे उपाध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब झाले.
शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगला
दूध संघाच्या उपाध्यक्षपदासाठी तीन अर्ज आले होते. त्यात एक काँग्रेस तर दोन शिवसेनेचे होते. मात्र ऐन वेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. यापैकी एकजण भुमरे गटातील तर दुसरा अब्दुल सत्तार गटातील होता. त्यामुळे यापैकी कोण माघार घेणार, यासाठी शनिवारी सकाळपासूनच बैठकांवर बैठका पार पडत होता. अखेर यासंबंधीचा निर्णय झाला आणि संदीपान भुमरे गटातील व्यक्ती उपाध्यक्षपदी विराजमान होईल, असा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे
औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या 14 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी सात जागा बिनविरोध तर उर्वरीत 7 जागांसाठी निवडणूक झाली होती. तसेच भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आता उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली होती. त्याचेही चित्र आज शनिवारी स्पष्ट झाले.
इतर बातम्या-