मेट्रोला केवळ राजकीय म्हणून विरोध नको, आत्ता विचार आणला तर 10-15 वर्षात प्रकल्प होईल, काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

शहरात जागा नाही, पण ट्रॅफिक वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे इथे मेट्रो कशी करता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत. पण काही लोक राजकीय विरोध म्हणून त्याला विरोध करतायत. आत्ता जर मागणी केली तर त्याला पुढचे पाच वर्ष, दहा वर्षे कितीही लागतील, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं.

मेट्रोला केवळ राजकीय म्हणून विरोध नको, आत्ता विचार आणला तर 10-15 वर्षात प्रकल्प होईल, काय म्हणाले डॉ. भागवत कराड?
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:19 PM

औरंगाबादः शहरात सुरु असणाऱ्या विकास कामांना केवळ राजकीय म्हणून विरोध करू नये, असा टोला केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी विरोधकांना लगावला आहे. औरंगाबादमध्ये आज पीएनजी योजनेअंतर्गत गॅस पाइप लाइनच्या (Aurangabad gas pipeline) कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) बोलत होते. शहरात सुरु असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी भाषणात दिली. तसेच मेट्रोला विरोध करणाऱ्यांनाही चांगलंच फटकारलं. विकास प्रकल्पाची (Development projects) संकल्पना आत्ता मांडली तर भविष्यात काही वर्षांनी ती आकार घेईल, त्यामुळे आत्ताच त्याला विरोध करणं चुकीचं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

काय म्हणाले, डॉ. भागवत कराड?

शहरात वेगवेगळ्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम सुरु आहे. शहरात 700 सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. मिटमिट्यात सफारी पार्कचं काम सुरु आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शहरात आणखी चार ब्रिजची आवश्यकता आहे, असा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवला. तेव्हा त्यांनी चारऐवजी एकच अखंड पूलाची योजना आमच्यासमोर सांगितली. आम्ही त्यांचं स्वागतच केलं. त्यामुळे आता शेंद्रा ते वाळूज या दोन एमआयडीसींना जोडणाऱ्या अखंड पूलाचा डीपीआर करणं सुरू आहे.  पुढचे 25 वर्षे अमृतकाळ असा उद्देश ठेवून देशाचं बजेट तयार झालं आहे. तेच लक्ष्य समोर ठेवून आम्ही शहरात मेट्रोची मागणी केली. शहरात जागा नाही, पण ट्रॅफिक वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे इथे मेट्रो कशी करता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत. पण काही लोक राजकीय विरोध म्हणून त्याला विरोध करतायत. आत्ता जर मागणी केली तर त्याला पुढचे पाच वर्ष, दहा वर्षे कितीही लागतील. मला माहिती नाही. पण किमान तो विचार आणून ते काम करण्याची गरज आहे. म्हणून औरंगाबादेत रस्ते, नॅशनल हायवेसाठी मी प्रयत्न करतोय, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं.

पर्यटन वाढवण्यासाठी येत्या सहा महिन्यात अनेक योजना

औरंगाबादमधील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं. ते म्हणाले,  वेरुळ आणि अजिंठ्यामुळे औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा आहे. जिल्ह्यात शहरात वेरूळ, अजिंठा, बीबी का मकबरा, सोनेरी महल, दौलताबाद, घृष्णेश्वर मंदिर, अहिल्यादेवी कुंड, शहाजीराजाची गढी आहे. या सहा ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. येत्या सहा महिन्यात प्रत्येक ठिकाणाचं भूमीपूजन करु.

स्वस्त आणि सुरक्षित गॅसची हमी- डॉ. कराड

शहरात नव्या योजनेद्वारे जो गॅस पुरवला जाणार आहे, त्याची वैशिष्ट्ये सांगताना डॉ. कराड म्हणाले, ‘ नव्या योजनेद्वारे पुरवला जाणारा गॅस हा वजनाला अगदी हलका असतो. त्यामुळे तो लिक झाला तरी हवेत विरघळून जातो. त्यामुळे एलपीजीच्या तुलनेत हा सुरक्षित आहे. घरोघरी जेवढा गॅस वापरला जाईल, तेवढंच बिल तुम्हाला येईल. शहरात रोज 25 हजार सिलिंडर लागतात. यासाठी भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्याद्वारे ट्रकमधून सिलिंडर इथे आणले जातात. ही धोकादायक वाहतूक बंद होईल. शहराच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासासाठी ही पाइपलाइन मोठी भूमिका बजावणार आहे.

इतर बातम्या-

कल्याणच्या गौरीपाडा तलावातील कासवांचा मृत्यू बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे; कासवांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्हं

बारामतीत बोंबाबोंब आंदोलन! ‘वीजबिल माफ करा’, भाजपचं बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर निदर्शनं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.