Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाळाला आडवं गंध, खांद्यावर रुमाल, उज्जैनच्या गुंडाचे फॉलोअर्स औरंगाबादेत, कोण आहे दुर्लभ कश्यप?

सोशल मीडियातून जग जवळ आलं पण जवळ आलेल्या असंख्य व्यक्तींपैकी कोण आदर्श, कोण दुराचारी, यातल्या सीमारेषा पुसट होत गेल्या. त्यातूनच गुंडगिरी प्रवृत्ती वाढीस लागतेय. मुंबईत हजारो पोरांना रस्त्यावर उतरायला लावणारा हिंदुस्थानी भाऊ तसाच.. अन् गँगवॉरमध्ये मरण पावल्यानंतरही हजारो फॉलोअर्स असलेला दुर्लभ कश्यप काय.. गुंडगिरी की नेतृत्व यातला फरक न कळणं हे समाजासाठी मोठं घातक ठरू शकतं. औरंगाबादचं हे उदाहरण यासाठी बोलकं आहे.

कपाळाला आडवं गंध, खांद्यावर रुमाल, उज्जैनच्या गुंडाचे फॉलोअर्स औरंगाबादेत, कोण आहे दुर्लभ कश्यप?
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 2:00 AM

औरंगाबाद: दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत MPSC ची तयारी करणाऱ्या शुभम मनगटे या तरुणावर तलवारी, चाकू आणि फायटरनं हल्ला (Aurangabad youth attacked) झाला. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला तब्बल 50 टाके पडले. शुभमवर झालेल्या या हल्ल्याचं कारण म्हणजे त्याच्या दुकानात फुकट गुटखा मागण्यात आला. मात्र शुभमने पैसे न घेता गुटखा देण्यास नकार दिला. एवढ्याच कारणासाठी शुभमला बाजूच्याच एका मोकळ्या मैदानावर नेण्यात आलं आणि त्याच्यावर तलवार, चाकू आणि फायटरने सपासप वार (Beaten with Sword) करण्यात आले. जिवाच्या आकांतानं शुभम ओरडू लागला. पण कुणी मदतीला आलं तर त्याचीही खैर नाही, अशी धमकी देण्यात आली. दारं-खिडक्या उघडलेल्या नागरिकांनी माघार घेतली. अखेर शुभमचे मित्र घटनास्थळी आले आणि कसा-बसा जीव वाचला. कोण होते हे गुंड? 5 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत पोलिसांनी (Aurangabad police) राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, आतिष मोरे, शेख बादशहा, नीलेश धस, पिण्या खडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला. यापैकी पाच आरोपींना अटकही केली. हे टोळकं अशा प्रकारे हिंस्र होऊ शकतं, याची कल्पना पोलिसांना नव्हती, असा प्रकार नाही.

नंग्या तलवारी घेऊन नाचलेले हेच!

यापैकी यश पाखरे आणि शेख बादशहा हे दोघे या सदर हल्ल्याच्या दोन दिवस आधीच पोलीस कोठडीतून बाहेर आले होते. 26 जानेवारी रोजी एका लग्नात तलवारी घेऊन नाचताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. बाहेर येताच हे टोळकं शुभमच्या दुकानावर विडी-सिगारेट मागण्यासाठी गेलं. पण त्याने फुकट देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही शुभमने असाच नकार दिला तेव्हा त्याला संपवायचंच, या हेतूनं असा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Sword in Marriage

दुर्लभ कश्यपचे फॅन म्हणवतात…

गेल्या काही दिवसांपासून पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर भागातील गुंडगिरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सतत मारहाण, हत्या, हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. युवा, तरुणांची गुंडांची टोळीच जणू तयार झाली आहे. कुठेही बिनधास्त, बेधडक जीवघेणे हल्ले करणाऱ्या या टोळक्यावर पोलिसांचा वचकच राहिला नाही, असे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सगळेजण स्वतःला दुर्लभ कश्यपचे फॉलोअर्स मानतात. आता हा दुर्लभ कश्यप कोण आहे, हेही पहावं लागेल. तर हा दुर्लभ कश्यप म्हणजे अशाच प्रकारे अगदी किशोरवयात असताना गुंडगिरीत आलेले आणि सोशल मीडियावर खुलेआम सुपारी घेण्याची जाहिरात करणारा उज्जैनमधला गुंड. औरंगाबादचं हे टोळकंही सोशल मीडियावर सर्रासपणे मी दुर्लभ कश्यपचा मोठा चाहता असल्याचं सांगतात. आपण दुर्लभ कश्यप गँगचे सदस्य आहोत, असे मानतात. ज्या भागात हे टोळकं गप्पांसाठी बसतं तिथं गुटखा, तंबाखू, सिगारेटची पाकिटं, नशेचं सामान पडलेलं दिसून येतं. येथील नागरिकांमध्ये या गँगची मोठी दहशत असून मुलींना रस्त्यावरून चालण्याचीही भीती वाटते.

Insta account image

औरंगाबादेतील आरोपी तरुणाचे हे इन्स्टाग्राम प्रोफाइल

कोण आहे दुर्लभ कश्यप?

आता हा दुर्लभ कश्यप कोण आहे, असं म्हणण्यापेक्षा, कोण होता तो असं विचारणं योग्य ठरेल. कारण या नावाचा गुंड सप्टेंबर 2020 मध्येच गँगवॉरमध्ये ठार झालाय. मूळ मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असलेला दुर्लभ कश्यप हा 16 व्या वर्षीच गुन्हेगारीच्या मार्गाला लागला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, सोशल मीडियावर तो खुलेआमपणे कुणाची सुपारी द्यायची असेल तर माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन करायचा. त्याचा पोशाखही तसाच. कपाळावर आडवं गंध आणि डोळ्यात काजळ, गळ्यात काळा रुमाल ठेवण्याची पद्धतही वेगळी. त्याच्या फेसबुक पोस्टवरून शेकडो तरुण त्याच्याशी जोडले गेले. खून, मारामारी, हफ्ता वसूली आदी कामांचा ठेका हे घेत असत. त्याच्या गँगच्या फेसबुक आयडी मॅनेज करण्यासाठी विशेष टीम होती. त्याच्यावर जेलमधील गुंडांचेही फोटो अपलोड केले जात होते. वयाच्या 16 व्या वर्षीच गुंडगिरीत आलेला आणि कुख्यातीतून मोठे फॉलोअर्स मिळवलेल्या दुर्लभ कश्यपचा अंतही असाच झाला. 06 सप्टेंबर 2020 रोजी एका गँगवॉरमध्ये त्याचा मृत्यू झाला. कश्यपचा एवढा निर्घृण अंत होऊनही आजही तरुण पिढी त्याच्या मार्गावर चालतेय, हे मोठं समाज म्हणून मोठं घातक लक्षण आहे.

कही देवता ना बन जाऊ.. इसलिये पाप भी करता हूँ…

Insta Account

औरंगाबादमधील आरोपी राजू पाठाडे याचे इस्टाग्रामचे प्रोफाइल

औरंगाबादच्या पुंडलिक नगर भागात गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यांचे इस्टाग्राम, फेसबुक अकाउंट पाहिले त्यावरही त्यांनी सर्रास आपण दुर्लभ कश्यप गँगचे मोठे चाहते असल्याचं लिहिलं आहे. याच गँग मधल्या राजू पठाडे याच्या इस्टाग्रामच्या अकाउंटवर प्रोफाइलमध्ये लिहिलं..पूजा भी करता हूं… जाप भी करता हू.. कही देवता ना बन जाऊ इसलिये पाप भी करता हू.. पुंडलिक नगर भागातील चौका चौकात हे गुंड टोळक्याने उभे राहता. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करतात. दुकानातून फुकट सामान घेणे, मुली- महिलांची छेड काढण्याचे प्रकार सर्रास होतात. कुणी पोलीस तक्रार करण्यास गेल्यास यांचे म्होरके, भूखंड माफिया आहेत, ते यांना सोडून घेऊन जातात. त्यामुळे लोक या परिसरातील घरेही विकून जात आहेत.

युवासेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Yuwa sena Aurangabad letter

औरंगाबाद युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्त्वात पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र

दरम्यान, शुभम मनगटे या तरुणावर हल्ला झाल्यानंतर पुंडलिक नगर या भागातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. या भागातील गुंडांवर कायद्याचा जरब बसावा, यासाठी पोलिसांनी कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे केले आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आता यांनी यापूर्वी येथील ठाणेदारांची बदली करून पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची नेमणू केली होती. परंतु त्यांचा या भागात काहीही दरारा नाही. उलट गुंडगिरी अधिक फोफावल्याचे चित्र आहे. या टोळ्यांना कोण पोसतो, या गुंडांना कुणाचा वरदहस्त आहे, याचा शोध घेऊन योग्य बंदोबस्त लावण्यात यावा, याच प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.

इतर बातम्या-

Hijab : देशामध्ये कुणी काय खायचं? कसे कपडे वापरायचे? हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? मलिकांचा थेट मोदींना सवाल

परशुराम ग्रामस्थांशी चर्चा करून घाटातील काम सुरूच ठेवा, दुर्घटनेनंतर आ. भास्कर जाधव यांच्या सूचना

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.