Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?

मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?
औरंगाबादेत नमाज पठणावेळी खासदार जलील भावूक Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:56 AM

औरंगाबादः तब्बल दोन वर्षानंतर औरंगाबादच्या ईदगाह (Eidgah Ground) मैदानावर हजारो मुस्लिम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हेदेखील उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुस्लिम भाविकांनी (Muslim Devotees) नमाज पठणास सुरुवात केली. नमाज म्हणजे अल्लाहकडे क्षमा याचना करण्याचा प्रसंग असतो. यावेळी खासदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले. नमाज पठण सुरु असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकिकडे नमाज पठण सुरु होते तर इकडे खासदार जलील डोळ्यांतील अश्रू पूसत होते. त्यामुळे इम्तियाज जलील एवढे भावूक का झाले, असाच प्रश्न सर्वांच्या मनात आला. मात्र नमाज पठण झाल्यानंतर स्वतःच्या भावना आवरत खासदार जलील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना अश्रू येण्याचं कारण सांगितलं.

का भावूक झाले खासदार जलील?

नमाज पठण झाल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, खासदार जलील म्हणाले, मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे आपण अनेक प्रियजनांना गमावलं आहे. दोनच महिन्यांपूर्वी मी माझ्या आईला गमावलं. आईशिवाय ही पहिली ईद आहे. त्यामुळे नमाज पठण करताना आठवणींचा बांध फुटला..’

‘देशात शांतता, बंधूप्रेम रहाण्यासाठी प्रार्थना’

ईदनिमित्त देशभरातील मुस्लिम भाविकांना शुभेच्छा देताना खासदार जलील म्हणाले, ‘ दोन वर्षात अनेक नातेवाईक, मित्र गमावले. देशातील स्थिती पाहता, शांतता, बंधूप्रेम राखण्याची गरज आहे. आज देशातील मशिदींवर संकट आलं आहे. नमाज पठणापासून रोखलं जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वांनी दुआ मागितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशात शांतता व बंधुप्रेम राहण्यासाठी आम्ही प्रार्थना केली. मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केली आहे.’

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.