औरंगाबादेत इलेक्ट्रिक डबल डेकर बससाठी किमान 9 महिन्यांचे वेटिंग! मुंबईतील बसची स्मार्ट सिटीकडून पाहणी
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांना प्रवासासाठी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस खरेदी कराव्यात, अशी सूचना केली होती. त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली.
औरंगाबादः शहर प्रदुषण मुक्त करण्याच्या दिशेने स्मार्ट सिटीमार्फत (Aurangabad Smart city) अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. याअंतर्गतच शहरात डबल डेकर इलेक्ट्रिक बस (Electric Double Decker bus) सुरु करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. यासाठी औरंगाबादच्या टीमने मुंबई येथील इलेक्ट्रिक डबल डेकर बसची पाहणीदेखील केली. मात्र अशा प्रकारच्या बस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे 9 महिन्यांचे वेटिंग आहे. त्यामुळे सदर बसेस औरंगाबादेत (Aurangabad) आणण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरही शहरवासियांना काही काळ यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डबल डेकर बससाठी आदित्य ठाकरेंची सूचना
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांना प्रवासासाठी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस खरेदी कराव्यात, अशी सूचना केली. त्यानुसार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
स्मार्ट सिटीच्या पथकाची मुंबई पाहणी
औरंगाबादकरांसाठी इलेक्ट्रिक डबल बस उपलब्ध करून देण्याकरिता निविदा तयार करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी केली असून 900 बसेस खरेदीसाठी निविदा काढली आहे. याबद्दलची माहिती घेण्यासाठी स्मार्ट सिटीचे पथक नुकतेच मुंबई येथे जाऊन आले. मुंबईतील बेस्टच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची माहिती दिली. औरंगाबाद स्मार्टी सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कर शिवम यांनी या विषयी माहिती दिली. मुंभई म हापालिकेलाच इलेक्ट्रिक डबल डेकर बसेससाठी 9 महिन्यांचे वेटिंग करावे लागणार आहे, कारण त्यांनी 900 डबल डेकरची ऑर्डर दिलेली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीला 20 इलेक्ट्रिक डबलडेकर बस खरेदी करायच्या आहेत. त्यानुसार शहरवासियांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
इतर बातम्या-