Aurangabad | हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी, वंचित आघाडीची कोर्टात धाव, वाद पेटणार?
पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
औरंगाबादः हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे शहरात आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. या कार्यक्रम होऊ नये, असे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर भाजपचा विरोधा काहीसा मावळलेला दिसतानाच आता पोलिसांनी या कार्यक्रमाला आडकाठी घातली आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन कऱण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली असून पोलीस आणि वंचित आघाडी असा संघर्ष आज पहायला मिळणार आहे. त्यामुळे औरंगाबादचं वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून सुरु झालेल्या वाद थंड झाला असताना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्नाटकात चर्चेत आलेल्या मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे नियोजन असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे शहरात आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते संजय केणेकर यांनी दिला होता. आज सोमवारी भाजपचा विरोध काहीसा मावळलेला दिसत असतानाच पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
वंचित आघाडीची कोर्टात धाव
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही आमखास मैदानावर आयोजित केलेला हा कार्यक्रम त्याच वेळेत आणि त्याच ठिकाणावर घेणार, असा ठाम निर्णय वंचित आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इतर बातम्या-