Aurangabad | मानाची Holi संध्याकाळी 7 वाजता, संस्थान गणपतीसमोर तयारी, गैरवर्तन केल्यास कारवाई!

धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून राजाबाजार येथून निघणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. यंदादेखील या मिरवणुकीसाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

Aurangabad | मानाची Holi संध्याकाळी 7 वाजता, संस्थान गणपतीसमोर तयारी, गैरवर्तन केल्यास कारवाई!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 2:14 PM

औरंगाबादः कोरोना काळानंतर यंदा प्रथमच मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या होलिकोत्सवासाठी औरंगाबाद (Aurangabad Holi) सज्ज आहे. गुलमंडीवरील होळीकरिता येथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर शहरातील मानाची होळी अर्थात संस्थान गणपतीसमोरची होळी संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आली आहे. होलिकोत्सवाच्या (Holi celebration) शुभेच्छा देणारे मोठे बोर्ड शहरात ठिकठिकाणी झळकले आहेत. तसेच कॉलन्यांमध्येही चौका-चौकात होळीसाठी एरंड्याचे झाड आणून बच्चे कंपनी आणि तरुणांनी होळीची तयारी सुरु केली आहे. संस्थान गणपतीसमोरील (Sansthan Ganapati) शहरातील मुख्य होळीचीदेखील तयारी झाली आहे. या होळीला  शहरातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते, अधिकारी, पोलीस आयुक्त आदींची उपस्थिती असेल.

संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत

शहरातील मानाच्या होलिकोत्सवाची वेळ संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अशी नियोजित करण्यात आळी आहे. यासाठी संस्थान गणपती विश्वस्त मंडळातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता विधीवत होळी पेटवली जाईल.

धुळवड- सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी

धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून राजाबाजार येथून निघणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. यंदादेखील या मिरवणुकीसाठीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच शहरात जमावबंदीचे आदेश लागू असून नियमाचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

धुळवडीसाठी काय नियम?

राज्य सरकारने धुळवड आणि होळीसाठी काही नियम जारी केले आहेत. ते पुढील प्रमाणे- – रात्री 10 च्या आत होळीचे पूजन करून ती पेटवावी – डीजे लावण्यास बंदी – बीभत्स वर्तन केल्यास कारवाई – महिला व मुलींबाबत खबरदारी घ्यावी. – पायी किंवा वाहनावर रॅली काढण्यास परवानगी नाही. – कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नयेत. – जबरदस्तीने रंग लावू नये. कोणावरही पाण्याचे फुगे फेकू नयेत. – कुणीही दुचाकीवर तिघे बसू नये. कारच्या टपावर बसू नये. तसे आढळल्यास कारवाई केली जाईल.

इतर बातम्या-

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय, लॉन्स फेडरेशनची स्थापना; Corona संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासाच्या भाड्यात सूट नाहीच; पूर्ण भाडे भरावे लागणार, रेल्वे मंत्र्यांची संसदेत माहिती

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.