Aurangabad | शेंदूरवादा परिसरात बेफाम वाळू उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष का? व्हिडिओ व्हायरल
या वाळू उपशासाठी शेतात तसेच नदीपात्रात तीस फूट खोल खड्डे खोदून ठेवल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यामुळे जमिनीची अक्षरशः चाळणी केल्याचे हे दृश्य आहे. या बेसुमार वाळू उपश्याकडे तलाठी तहसीलदार आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष कसे होते, असा सवाल केला जात आहे.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) शेंदूरवादा परिसरातून वाळूचा बेफाम उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतात आणि नदीत जवळपास तीस फूट खोल खड्डे खोदून हा वाळू उपसा सुरु असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदूरवादा भागातील असल्याचा दावा केला जात आहे. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असून या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे (Local Administration) दुर्लक्ष कसे होतेय, असा सवाल विचारला जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष ?
दिवसा ढवळ्या वाळू उपशाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वाळू उपशावर बंदी असतानाही कुणाच्या भरोशावर हा गोरखधंदा चालतो, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्षदेखील अक्षम्य आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
जमिनीची अक्षरशः चाळणी

इतर बातम्या-