मित्रानेच ठेवला होता फर्निचरच्या दुकानात बॉम्ब! औरंगाबादच्या कन्नडमधील बॉम्बचा दोन दिवसात उलगडा

औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपी हा किरकोळ स्फोटांची कामे करायचा. त्यामुळे त्याला बॉम्ब बनवणे संदर्भातली माहिती होती.

मित्रानेच ठेवला होता फर्निचरच्या दुकानात बॉम्ब! औरंगाबादच्या कन्नडमधील बॉम्बचा दोन दिवसात उलगडा
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 4:24 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड शहरात (Kannad City) आढललेल्या बॉम्ब प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. फर्निचरच्या दुकानात (Furnuture Shop) ठेवलेला हा बॉम्ब दुकानदाराच्या मित्रानेच ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. कन्नडमध्ये 09 जून रोजी सकाळच्या वेळात फर्निचरच्या दुकानात हा बॉम्ब (Bomb) सापडला होता. या मुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी हा परिसर रिकामा केला. त्यानंतर बॉम्बनाशक पथकाला बोलावून हा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्ब नक्की कुणी ठेवला होता? हा ठेवण्यामागील उद्देश काय, याचा शोध पोलीस घेत होते.

मित्रानेच ठेवला होता बॉम्ब

औरंगाबाद पोलिसांनी दोन दिवसात सदर प्रकरणाचा उलगडा केला आहे. दरम्यान, बॉम्ब नक्की कुणी ठेवला याचा तपास करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकही शहरात येऊन गेल्याची माहिती आहे. फर्निचरच्या दुकानातील हा बॉम्ब पैशांच्या वादातून मित्रानेच पेरल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्याची कबूली दिली आहे.

आरोपी ताब्यात

औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपी हा किरकोळ स्फोटांची कामे करायचा. त्यामुळे त्याला बॉम्ब बनवणे संदर्भातली माहिती होती. त्याने बनवलेला बोंब अत्यंत कमी क्षमतेचा आणि एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवण्यात इतपत होता. मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. घडलेल्या प्रकारामुळे कन्नड शहरांमध्ये खळबळ माजली होती. आता या आरोपीला अटक करण्यात आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हे सुद्धा वाचा
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.