पत्नीच्या मृत्यूनंतर डॉक्टर युवतीशी लगट करणाऱ्याला पोलिसांच्या बेड्या, औरंगाबादची घटना

| Updated on: Feb 24, 2022 | 11:08 AM

सदर इसमाच्या वर्तणुकीची माहिती डॉक्टर तरुणीने रुग्णालयाची सुरक्षा पाहणाऱ्या मेस्को कंपनीचे इन्चार्ज के. टी. गायकवाड यांना दिली होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच तिची छेड काढली जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलेदेखील नाही, अशी तक्रार तरुणीने केली.

पत्नीच्या मृत्यूनंतर डॉक्टर युवतीशी लगट करणाऱ्याला पोलिसांच्या बेड्या, औरंगाबादची घटना
crime
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबादः शासकीय कर्करोग रुग्णालयात (Aurangabad Hospital) उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तरुणीसोबतच गैरप्रकार (Molesting the girl) करण्याची घटना घडली. पत्नीचे निधन झाल्यानंतर तसेच उपचार सुरु असतानादेखील पतीने वारंवार डॉक्टर तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराविरोधात डॉक्टर तरुणीने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. अखेर तिने पोलीस स्टेशनमध्ये (Aurangabad police) तक्रार केल्यानंतर दामिनी पथक तिच्या मदतीला धावले. डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉक्टर तरुणीची वारंवार छेड काढली

सदर प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया वसंतराव टाक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कन्हैया याची पत्नी राधा यांना 3 फेब्रुवारीला कर्करोग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. 8 फेब्रुवारीला राधाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे नातेवाईक घरी येऊन गेले. 9 फेब्रुवारीला रात्री कन्हैया नरल वॉर्डात येऊन पत्नीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला धन्यवाद म्हणून ‘आ. लाइक यू’ असे बोलून निघून गेला. त्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत तिला अडवून बोलू लागला. 20 फेब्रुवारीला त्याने रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपस्थित डॉक्टरांना पत्नीच्या तेरवीची पत्रिकाही दिली. 22 फेब्रुवारीला पीडित डॉक्टर मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजता घरी जात असताना त्याने समोर येऊन गाडी थांबवली. तसेच स्वतःजवळील चावी देऊन स्वतःची गाडी वापरण्यास ठेवा, असे सांगितले. तिने नकार दिल्यानंतर आवाज चढवत स्कूटी बंद करण्याची ताकीद दिली. या प्रकारानंतर विद्यार्थिनीने बुधवारी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

खासगी सुरक्षा रक्षकांचे आरोपीला सहकार्य

दरम्यान, सदर इसमाच्या वर्तणुकीची माहिती डॉक्टर तरुणीने रुग्णालयाची सुरक्षा पाहणाऱ्या मेस्को कंपनीचे इन्चार्ज के. टी. गायकवाड यांना दिली होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच तिची छेड काढली जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलेदेखील नाही, अशी तक्रार तरुणीने केली.
दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या घटनेनंतर बुधवारी पुन्हा आरोपी रुग्णालयात आल्यानंतर दामिनी पथक आणि सिटी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करत त्याला अटक केली.

इतर बातम्या-

‘बांगलादेशातून मुली आणून वेश्याव्यवसाय केला, आमच्याकडे Video आहे’ आणखी एक सनसनाटी आरोप

नागपूर मनपा निवडणुकीची धुळवड, उमेदवारी अर्जासाठी पक्षांना हवा निधी, कोणत्या पक्षाचे रेट किती?