औरंगाबादेत Metro रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी आठवडाभरात पथक दाखल होणार, कोणत्या मार्गासाठी डीपीआर बनणार?

| Updated on: Feb 02, 2022 | 3:00 AM

महामेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त कंपनी आहे. डीपीआर तयार करण्यासाठी या कंपनीला 6 कोटी 55 लाख रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हा खर्च उचलण्याची तयारी स्मार्ट सिटीने दर्शवली आहे.

औरंगाबादेत Metro रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी आठवडाभरात पथक दाखल होणार, कोणत्या मार्गासाठी डीपीआर बनणार?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या (Aurangabad Municipal corporation) पार्श्वभूमीवर शहरात सध्या अनेक विकास प्रकल्पांच्या चर्चा सुरु आहेत. त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे शहरातील वाळूज ते शेंद्रा मार्गावरील मेट्रो रेल्वेचा (Metro Railway) प्रकल्प. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी घोषणा केल्यानंतर या शहरात या प्रकल्पाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. आता या कामाला आणखी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी महामेट्रोचे एक पथक पुढील आठवड्यात शहरात दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या प्रकल्पाच्या डीपीआरचे कामही सुरु होणार आहे.

महिनाभरात मेट्रोल प्रकल्पाला वेग

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मेट्रो रेल्वे सुरु करण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही मेट्रोच्या विषयावर महापालिका, स्मार्ट सिटी आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यात वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी मेट्रो आणि फ्लायओव्हरचा डीपीआर बनवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने डीपीआर बनवण्यासाठी महामेट्रोला कार्यारंभ करण्याचे आदेश दिले. आता महामेट्रोने सर्वेक्षणाच्या दृष्टीने तयारी सुरु केकली आहे.

डीपीआरसाठी 6.50 कोटींचा खर्च

महामेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त कंपनी आहे. डीपीआर तयार करण्यासाठी या कंपनीला 6 कोटी 55 लाख रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हा खर्च उचलण्याची तयारी स्मार्ट सिटीने दर्शवली आहे. त्यानंतर कंपनीला कार्यारंभ आदेश दिले गेले. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. या सर्व अडचणी या आराखड्यामुळे दूर होणार आहेत.

आधी वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी मार्गासाठी डीपीआर

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत एक नव्हे तर दोन दोन मेट्रो रेल्वे मार्गांची घोषणा केली होती. शेंद्रा ते वाळूज पंढरपूर या मार्गावर मेट्रो प्रकल्प साकारण्याची महापालिकेची पूर्वीचीच योजना होती. केंद्रीय मंत्र्यांच्या प्लॅनमध्येही ही योजना आहे. तसेच बिडकीन ते हर्सूल या मार्गावरही मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाची योजना असल्याचे डॉ. कराड यांनी म्हटले होते. यापैकी आता वाळूज ते शेंद्रा या मार्गासाठी डीपीआर तयार करण्याकरिता महामेट्रोचे पथक शहरात पुढील आठवड्यात येणार आहे.

इतर बातम्या-

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

पोलीस दाम्पत्याचं घरगुती भांडण विकोपाला गेलं, महिलेने जीवनच संपवलं; गडचिरोलीतील मन सुन्न करणारी घटना