औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे Abdul Sattar चालतात, मग MIM का नकोय? खासदार जलील यांचा राऊतांना सवाल

एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा, असे आव्हान खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेला दिले आहे. स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला.

औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे Abdul Sattar चालतात, मग MIM का नकोय? खासदार जलील यांचा राऊतांना सवाल
खासदार इम्तियाज जलील यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 12:09 PM

औरंगाबादः आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. त्याला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला. तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा, असे आव्हान खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेला दिले आहे. स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला.

काय म्हणाले खासदार जलील?

महाविकास आघाडीसोबत जाण्याचा एमआयएमचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे धुडकावल्यानंतर टीव्ही 9 ने खासदार इम्तियाज जलील यांची पुन्हा प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘माझा संजय राऊतांना एकच प्रश्न आहे, तुम्हाला मुस्लिम मते पाहिजेत की नाही? तुम्हाला आमचे अब्दुल सत्तार चालतात. ते औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतात. ते चालतात, मग एमआयएम का नकोय? आमची पार्टी तुमच्यासारखी नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर करता. तुमच्यापेक्षा आम्ही त्यांचा जास्त आदर करतो, असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं.

‘हिंमत असेल तर काढा कुबड्या’

खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला इशारा देताना म्हटले की, तुम्हाला सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कुबड्या लागतात. हिंमत असेल तर काढा त्या दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर. एमआयएम तुम्हाला नको असेल तर आम्ही एकट्याच्या बळावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत, पुन्हा आमच्यामुळे भाजप निवडणुक लढलात असा आरोप करू नका, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं.

तुम्हाला मुस्लिम मतं पाहिजेत की नको?

खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना खासदार यांना एकच महत्त्वाचा सवाल यावेळी केला. ते म्हणाले, तुम्हाला मुस्लिम मते पाहिजेत की नको. तसे असेल तर तुम्ही जाहीरपणे सांगा. आम्ही कुणाच्याही कबरीपुढे जाऊन नतमस्तक होत नाहीत. आम्ही फक्त अल्लाहसमोर नतमस्तक होतो. तरीही तुम्हाला एमआयएम नको असेल तर तसं सांगा. औरंगाबादमधल्या मुस्लिमांची मतांची तुम्हाला गरज नाही, असं स्पष्ट जाहीर करा, आमची त्यासाठीही तयारी आहे, असं आव्हान खासदार जलील यांनी दिलं.

इतर बातम्या-

Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!

Photo Gallery: इगतपुरीमध्ये 2 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याच्या काळजाचे पाणी-पाणी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.