Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार निधी… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य,औरंगाबादेत पुस्तक वितरण कार्यक्रमात उपस्थिती

मराठवाडा मतदारसंघातील शिक्षक आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या वतीने मराठवाड्यात दहा कोटी 31 लाख 25 हजार रुये किंमतीची 11 लाख, 71 हजार 500 पुस्तकांचे वितरण केले जात आहे.

Aurangabad | महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार निधी... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य,औरंगाबादेत पुस्तक वितरण कार्यक्रमात उपस्थिती
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:16 PM

औरंगाबादः राज्यात आमदार आणि खासदार यांची तुलना केली तर आमदारांना सर्वाधिक निधी मिळणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आमदार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करतात. त्यांचा थेट लोकांशी संबंध असतो. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी जास्त निधी दिला आहे, याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. मराठवाडा मतदारसंघातील शिक्षक आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या वतीने मराठवाड्यात दहा कोटी 31 लाख 25 हजार रुये किंमतीची 11 लाख, 71 हजार 500 पुस्तकांचे वितरण केले जात आहे. या पुस्तकांच्या वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, आरोग्यमंत्री राजेश टोपे व औरंगाबादमधील इतर लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. शहरातील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

15 मिनिटांच्या कार्यक्रमाला तासभर घेतला…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार विक्रम काळे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तक वितरणाचा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ज्ञानवृद्धीसाठी आमदार निधी खर्च होणे ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. मात्र कार्यक्रमाला झालेल्या विलंबामुळे आमदार विक्रम काळे यांना शाब्दिक चिमटे काढण्याचंही पवारांनी सोडलं नाही. पुस्तक वितरण कार्यक्रमाला 15 मिनिटं लागतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र यासाठी एक तासभर गेला. शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधीचंच वेळंच गणित कच्चं असेल तर विद्यार्थ्यांचं काय होईल, असा सवाल शरद पवार यांनी केला.

विक्रम काळेंच्या कार्यक्रमाला मी दबकत येतो- अजित पवार

विक्रम काळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अजित पवार यांनीही चांगलीच थट्टा केली. ते म्हणाले, ‘ विक्रम काळे यांना मी दबकत कार्यक्रमात येतो कारण मागच्या वेळी सुप्रिया कार्यक्रमाला आली तर थेट मला मंत्री करा म्हणून मागणी केली, कारण काय तर की तीन वेळा निवडून आलोय आणि चंद्रकांत पाटील एकदाच निवडून आले त्यांना मंत्री केलं मला का नाही असा आमचा विक्रम आहे..’

आमदार निधी वाढतोच आहे, तरीही समाधान नाही

दरम्यान, राज्यातील आमदार निधीत सातत्याने वाढ होत असली तरीही आमदारांच्या मागण्या कमी होत नाहीयेत, असे सांगताना अजित पवार म्हणाले, ‘ साहेबांनी मला अर्थमंत्रालय दिलं तेंव्हा एक कोटींचा आमदार निधी मी 2 कोटी केला आणि आता मी तो आमदार निधी 5 कोटी केला आहे. खासदारांचा विकास निधी आहे 5 कोटी आणि आपला निधी आहे 5 कोटी तरीही समाधान मिळत नाही आत्ताच सतीश चव्हाण म्हणत होते हा निधी आणखी वाढवा, विक्रम काळे यांनीही अनेक मागण्या केल्या आहेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.