Aurangabad | शहरात अघोषित लोडशेडिंग, भर उन्हाळ्यात अन् सणासुदीत जनतेला त्रास देऊ नये, मनसेचा इशारा!

सध्या काही ठिकाणी जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्रावर हे लोडशेडिंगचं संकट कदापि येऊ देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे. 

Aurangabad | शहरात अघोषित लोडशेडिंग, भर उन्हाळ्यात अन् सणासुदीत जनतेला त्रास देऊ नये, मनसेचा इशारा!
औरंगाबाद मनसेचे महावितरणला निवेदन Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 6:18 PM

औरंगाबाद: शहरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कडाका (Summer temperature) वाढला असून सध्या औरंगाबादचे तापमान चाळीशीच्या पार पोहोचले आहे. त्यातच महावितरणतर्फे (MSEDCL) शहरातील अनेक भागांमध्ये अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासियांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वीजपुरवठा (Electricity) खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोन धडकत असून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीयेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या कार्यालयातही लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असून ऐन उन्हाळा आणि सणासुदीच्या दिवसात नागरिकांना त्रास देऊ नये, असा इशारा औरंगाबाद मनसेतर्फे देण्यात आला.

मनसेचे महावितरणला निवेदन

मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयाला यासंबंधीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, सध्या सर्व ठिकाणी अघोषित लोड शेडिंग सुरू झाली आहे, कालपासून मनसेच्या कार्यालयावर लोकांनी येऊन व्यथा मांडल्या आहेत, सर्व सामान्य जनतेचे सण तोंडावर आहेत. रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जन्मोत्सव, ईद सर्वच सण तोंडावर आहेत. अश्या परिस्थितीत जनतेस त्रास देऊ नये, भारनियमन करू नये, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या विनंतीनंतरही भारनियमन झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

तीन गोष्टींचा इशारा

औरंगाबाद मनसेने निवेदनात तीन गोष्टींचा इशारा दिला आहे- – महावितरण कॉल सेंटरवर सर्वसामान्यांचे फोन उचलले जात नाहीत, तो विषय मार्गी लावावा. – दुपारी करण्यात येणारे लोडशेडिंग आज-आत्तापासून बंद करावे – रेग्युलर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये.

राज्यात कोळशाचा तुटवडा, ऊर्जामंत्री काय म्हणाले?

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली असून वीजनिर्मितीवर याचा परिणाम झाला आहे. औष्णिक वीजनिर्मितीसाठीही मुबलक पाणी साठा नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आता खासगी कंपनीकडून वीज विकत घ्यावी लागणार आहे. सध्या काही ठिकाणी जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्रावर हे लोडशेडिंगचं संकट कदापि येऊ देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.

इतर बातम्या-

Chandrakant Patil : मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा गौप्यस्फोट

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक, बाटल्या आणि चपलाही फेकल्या! विश्वास-नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.