Aurangabad MNS Effect : परवानगिशिवाय भोंगा वाजवायचा नाही! राज ठाकरेंच्या सभेआधी औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा आदेश
राज ठाकरेंच्या आगामी सभेआधी औरंगाबादसह राज्याचे वातावरण तापले असतानाच पोलीस आयुक्तांचा हा आदेश म्हणजे मनसेचा इफेक्टच म्हणावा लागेल, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
औरंगाबाद : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) येत्या 01 मे रोजीच्या सभेआधीच औरंगाबादमध्ये मनसेच्या इशाऱ्याचे पडसाद दिसू लागले आहेत. राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे 03 मे पर्यंत हटवा असा इशारा मनसे (MNS Rally in Aurangabad) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यावरून सर्वच ठिकाणच्या लाऊड स्पीकरबाबतचे मुद्दे उचलून धरले गेले. या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद पोलीस आयुक्त (Aurangabad police commissioner) निखील गुप्ता यांनी नवे आदेश जारी केले आहेत. शहरात कुठेही भोंगे लावायचे असतील तर कायदेशीर परवानगी घ्या, असे आवाहन केले आहे, जर अनधिकृत लाऊड स्पीकर असल्यास मग ते कुठले ठिकाणी असो त्या ठिकाणी कारवाई केली जाईल, असे या वेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या आगामी सभेआधी औरंगाबादसह राज्याचे वातावरण तापले असतानाच पोलीस आयुक्तांचा हा आदेश म्हणजे मनसेचा इफेक्टच म्हणावा लागेल, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
पोलीस आयुक्तांचे आदेश काय?
औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले, ‘ लाऊड स्पीकर संदर्भामध्ये सर्वोच न्यायालयाने वर्ष 2005 मध्ये आणि राज्य सरकारने जो काही जीआर काढलेला आहे, त्यानुसार लाऊड स्पीकर परवानगीशिवाय लावता येत नाही. लाऊड स्पीकर लावण्याच्याही काही अटी शर्थी आहेत. त्यामुळे आम्ही आवाहन करत आहोत की, ज्यांनी ज्यांनी लाऊडस्पीकर्स लावले आहेत, त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज देऊन दे रेग्युलराइज करून घ्यावेत. आम्ही त्यात योग्य त्या परवानग्या देण्यास तयार आहोत. मात्र अनधिकृत लाऊडस्पीकर ठेवल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे सर्वांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करा. अर्ज देऊन लाऊडस्पीकरसाठीची कायदेशीर परवानगी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
‘सोशल मीडियातून प्रक्षोभक मेसेज व्हायरल करू नका’
पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, ‘ सोशल मीडियातून कुणीही तेढ निर्माण करत असेल तर असे मेसेज फॉरवर्ड करू नका. व्हायरल करू नका. औरंगाबाद सायबर पोलीस स्टेशनला याची माहिती द्या. कारण अशा प्रकारचे मेसेज तयार करणे आणि फॉरवर्ड करणे दोन्हीही गुन्हे आहेत. यात तीन वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. आपल्याला समाजात शांतता ठेवायची आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही मेसेज तयार करू नका. आमच्यापर्यंत असे काही आले तर आम्हाला माहिती द्या, जेणेकरून हे थांबवता येईल, असे आवाहान औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी केले आहे.
इतर बातम्या-