Aurangabad | मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींचा खर्च टाळा, अत्यावश्यक कामे करा! खा. इम्तियाज जलील यांची मागणी

वाळूज ते शेंद्रा असा जालना रोडवर अखंड पुल बांधण्याची योजना असून याच मार्गासोबत मेट्रो रेल्वेचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याचे काम महामेट्रो कंपनीकडे देण्यात आले असून यासाठी स्मार्ट सिटीतर्फे 7.5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

Aurangabad | मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींचा खर्च टाळा, अत्यावश्यक कामे करा! खा. इम्तियाज जलील यांची मागणी
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:22 PM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पातंर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईन डीपीआर (Aurangabad Metro) तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाला तत्काळ स्थगिती देऊन नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांना पाठवले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद शहरात विविध प्रकल्प राबविले जात असून जे प्रकल्प वास्तविकतेत शक्य आहेत आणि सर्वसामान्य नागरीकांच्या हिताचे आहेत, त्यावरच निधी खर्च करणे योग्य असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

खासदारांनी पत्रातून काय मागण्या केल्या?

  •  खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, औरंगाबाद शहरात मेट्रोलाईनचा डिपीआर महारेल संस्थेमार्फत तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी बजेटममधून महारेल संस्थेस रुपये 7.5 कोटी अदा करण्यात येणार असल्याचे समजते. सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा मी सदस्य असून सबब कमिटी संपूर्ण भारतातील विविध शहरात राबविण्यात येणारे विकासात्मक कामे व प्रकल्पांचे निरीक्षण करते. महारेल संस्था ही फक्त भरमसाठ फीस वसूल करुन जे शक्य होणार नाही असे डीपीआर बनवते, असे कमिटीच्या निदर्शनास आलेले आहे.
  • मेट्रोलाईन प्रकल्प हा पूर्णपणे खाजगी तत्वावर चालतो. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. मेट्रोलाईन प्रकल्प सुरु करण्यास हजारो कोटींची आवश्यकता असणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात महानगरपालिका निधी देऊच शकत नाही. मग मेट्रोलाईन प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा वाटा कसा व कुठून आणणार ? तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून उर्वरित निधी मिळविण्यासाठी औरंगाबाद मनपाच्या वाट्याची रक्कम आतापर्यंत भरण्यात आली नाही. त्याकरिता मनपातर्फे अनेक प्रयत्न सुरु आहे.
  • स्मार्टसिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रोलाईनचा डिपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहेत. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रोलाईन शक्यच नाही. सबब निधी शहरातील उद्याने व सद्यस्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषत: जालना रोडवर उड्डाणपूल हवे आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले आहे.

काय आहे औरंगाबादचा मेट्रो प्रकल्प?

औरंगाबाद शहरात शेंद्रा ते वाळूज तसेच बिडकीन ते हर्सूल या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची योजना आहे. त्यापैकी वाळूज ते शेंद्रा असा जालना रोडवर अखंड पुल बांधण्याची योजना असून याच मार्गासोबत मेट्रो रेल्वेचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याचे काम महामेट्रो कंपनीकडे देण्यात आले असून यासाठी स्मार्ट सिटीतर्फे 7.5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. मात्र मेट्रोवर खर्च करण्याऐवजी शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयींवर खर्च करावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

इतर बातम्या-

रशियन सैनिकांचा Flirt game, युक्रेनच्या महिलांना Tinderवर पाठवतायत Messages आणि Photos!

Video : भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, राजकारण हिमालयावरून खाली येतंय, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.