औरंगाबादः उद्योजकांसाठी नव संकल्पना मांडण्यांची संधी, आयडिया हॅकेथॉन 2022 स्पर्धेचे आयोजन, कुठे करणार नोंदणी?

विद्यार्थी, नवउद्योजक आणि एमएसएमईनी अधिक माहितीसाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.innovative.msme.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेत योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा,असे आवाहन मॅजिकच्या वतीने करण्यात आले आहे.

औरंगाबादः उद्योजकांसाठी नव संकल्पना मांडण्यांची संधी, आयडिया हॅकेथॉन 2022 स्पर्धेचे आयोजन, कुठे करणार नोंदणी?
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद : शहरातील नव उद्योजक तथा व्यवसायासंबंधी नव संकल्पना (New Concept) असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. शहरात एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 2022 (Hackathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तरुणांना आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना स्पर्धेत मांडता येतील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एमएसएमई चॅम्पियन्स योजनेअंतर्गत एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 2022 चे आयोजन केले आहे. तसेच एमएसएमई नाविन्यपूर्ण योजना (इन्क्युबेशन, डिझाइन आणि आयपीआर) सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश उद्योजकांना नवीन उपक्रम विकसित करण्यास मदत करणे आहे. जास्तीत जास्त नव युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा अॅक्सलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौंसिल (MAGIC) च्या वतीने करण्यात आले आहे.

24 मार्चपर्यंत स्पर्धेची मुदत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच या उपक्रमाची घोषणा केली आहे. एमएसएमई आयडिया हॅकाथॉन 2022 स्पर्धेमध्ये विद्यार्थी, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सआणि एमएसएमई यांच्याकडून समस्या सोडवण्याकरिता 24 मार्च 2022 रोजीपर्यंत नाविन्यपूर्ण कल्पना मागविण्यात आल्या आहे. मॅजिक संस्थेसारख्या सलग्न इंक्युबेटरच्या माध्यमातून या हॅकाथॉनमध्ये सहभाग नोंदविता येऊ शकेल. या मध्ये सहभागी स्पर्धकांची तज्ञ निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार असून सलग्न इंक्युबेटरमध्ये प्रोटोटाईप स्टेजवरील नवउद्योजकांना इनक्युबेशन प्रोग्रामकरिता निवड आणि आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

तीन गटात विजेत्यांना अर्थसहाय्य

इनक्युबेशन: या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे दडून राहिलेल्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणे आणि एमएसएमईना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे, ज्यामुळे त्यांच्या संकल्पना साकार होऊ शकतील. प्रत्येक कल्पनेसाठी 15 लाख रुपयां पर्यंत आर्थिक सहाय्य आणिसंबंधित संयंत्र आणि यंत्रसामुग्रीसाठी 1 कोटी रुपयांपर्यंत सहाय्य प्रदान केले जाईल. डिझाईन: याचा उद्देश भारतीय उत्पादन क्षेत्र आणि डिझाइन कौशल्य यांना एका समान व्यासपीठावर आणणे हा आहे. नवीन उत्पादनाच्या विकासासाठी, त्याच्या सतत सुधारणा आणि विद्यमान/नवीन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धनासाठी प्रत्यक्ष डिझाइन समस्यांवर तज्ञांचा सल्ला आणि किफायतशीर उपाय प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. डिझाइन प्रकल्पासाठी 40 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी 2.5 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल. आयपीआर (बौद्धिक संपदा अधिकार): एमएसएमईमध्ये बौद्धिक संपदा अधिकारांबाबत (IPRs) जागरुकता वाढवण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सर्जनशील बौद्धिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील बौद्धिक संपदा संस्कृती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. . विदेशी पेटंटसाठी 5 लाख रुपये , देशांतर्गत पेटंटसाठी 1.00 लाख , जीआय नोंदणीसाठी 2.00 लाख, डिझाईन नोंदणीसाठी 15,000/- ,आणि ट्रेडमार्कसाठी 10,000/- रुपये पर्यंत वित्तसहाय्य प्रतिपूर्ती स्वरूपात दिले जाईल.

कुठे करणार नोंदणी?

विद्यार्थी, नवउद्योजक आणि एमएसएमईनी अधिक माहितीसाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.innovative.msme.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेत योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा,असे आवाहन मॅजिकच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Arabic Kuthuचा परदेशातही धुराळा; ‘हा’ Super dance पाहून यूझर्स म्हणतायत, भावा, तू बॉलिवूडच्या प्रेमात पडलायस!

VIDEO | बॉम्ब कुठंय? धनंजय मुंडेंचे विधानसभेत हातवारे, विरोधकांना विचारणा, दंडही थोपटले!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.