Elections | औरंगाबाद महापालिकेचा बिगुल वाजणार, इच्छुकांना उत्साहाचं भरतं, यंदा 126 वॉर्ड, 42 प्रभाग आणखी काय बदल?

पुढील प्रक्रियेत प्रभाग आणि वॉर्ड हद्दीचा आराखडा जाहीर होऊन त्यावरील हरकतींची सुनावणी होईल. कुणी न्यायालयात गेले नाही तर हद्द निश्चित होतील. लकी ड्रॉद्वारे आरक्षण जाहीर होईल. आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाईल.

Elections | औरंगाबाद महापालिकेचा बिगुल वाजणार, इच्छुकांना उत्साहाचं भरतं, यंदा 126 वॉर्ड, 42 प्रभाग आणखी काय बदल?
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 9:39 AM

औरंगाबादः महापालिका निवडणुकांसंबंधी (Aurangabad municipal Corporation) प्रभाग रचनेची याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाली काढण्यात आली. त्यानुसार आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात, राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस महापालिकेचा बिगुल वाजण्याची चिन्ह आहेत. गुरुवारी हा निकाल लागल्यानंतर राजकीय गोटात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. इच्छुकांना उत्साहाचं भरतं आलं आहे. अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा निकाल काय लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे इतर महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेप्रमाणे औरंगाबादेतील (Aurangabad Elections) प्रक्रियेला म्हणावा तेवढा वेग येत नव्हता. आता निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकही नव्या जोमानं कामाला लागले आहेत.

यंदा 126 वॉर्ड 42 प्रभाग

– महापालिकेच्या 2015 मधील निवडणुकीत एकूण 115 वॉर्ड होते. मात्र आता राज्य निवडणूक आयोग्याच्या सूचनांनुसार, बहुसदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. – तीन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. म्हणजेच एका प्रभागात तीन सदस्य निवडून येतील. – एका वॉर्डाता 9 ते 10 हजार लोकसंख्या समाविष्ट असेल. – 3 वॉर्डांच्या एका प्रभागाची लोकसंख्या 30 हजारांपर्यंत असेल. – राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर 2021 रोजी काढलेल्या सूचनेनुसार शहरात यंदा 126 वॉर्ड तयार केले असून 42 प्रभागांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

अंदाजे लोकसंख्या किती, मतदार किती?

2011 च्या लोकसंख्येनुसार 10 टक्के लोकसंख्या वाढलेली असेल, असा अंदाज गृहित धरण्यात आला आहे. 2,286 प्रगणक गट असल्यामुळे त्यातूनच वॉर्ड आणि प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार लोकसंख्या पुढील प्रमाणे असेल. शहराची लोकसंख्या अंदाजे- 12 लाख 28 हजार 32 मतदारांची संख्या- 9 लाख 39 हजार 458

नव्या प्रभागरचनेचा आराखडा सादर

राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिकेने नोव्हेंबर महिन्याच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार, 126 वॉर्डांपैकी 63 जागा महिलांसाठी राखीव असतील. नवीन प्रभाग रचनेत 24 एससी, 3 एसटी, 34 ओबीसी आणि 65 सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य राहतील. मात्र ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय ही प्रक्रिया अशक्य आहे. आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. आक्षेप व सूचना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाईल.

पुढे काय प्रक्रिया?

प्रभाग आणि वॉर्ड हद्दीचा आराखडा जाहीर होऊन त्यावरील हरकतींची सुनावणी होईल. कुणी न्यायालयात गेले नाही तर हद्द निश्चित होतील. लकी ड्रॉद्वारे आरक्षण जाहीर होईल. आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाईल.

महापालिकेतील पक्षीय बलाबल काय?

शिवसेना- 29 भाजप- 23 एमआयएम-24 काँग्रेस-11 बसपा-05 राष्ट्रवादी- 04 रिपाइं- 02 अपक्ष- 17 एकूण- 115

इतर बातम्या-

रशियन सैनिकांचा युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ‘झापोरिझ्झिया’ जवळ गोळीबार

Russia Ukraine War Video: यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे हल्ले, जगावरचं आण्विक संकट पुन्हा गडद, विनाशाच्या उंबरठ्यावर?

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.