Aurangabad | स्मार्ट सिटीतील पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक आता मोबाइलवर, तुमच्या भागात अॅप चालणार का? वाचा सविस्तर….
पहिल्या टप्प्यातील शहरातील सिडको N-5 मधील जलकुंभा अंतर्गत येणाऱ्या भागांनाच या अॅपची सुविधा मिळणार आहे.
औरंगाबादः शहरातील नागरिकांना पाण्याच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीने (Aurangabad smart city) ‘जल – बेल’ (Jal Bell App) हे अॅप लॉन्च केले आहे. या ॲप मुळे शहरातील पाणीपुरवठ्याची सर्व माहिती एका क्लिक वर नागरिकांच्या हातात असेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या भागात येणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक आधीच उपलब्ध होईल. उन्हाळ्यात पाण्याची अतिरिक्त मागणीला लक्षात घेऊन मनपा आयुक्त व प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Astik kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा पाऊलं उचलत आहे. विविध उपाययोजना करून शहरातील येणाऱ्या पाण्याची आवक दहा ते पंधरा एमएलडीपर्यंत वाढवली जात आहे. याशिवाय पाण्याची चोरी, पाण्याचा अपव्यय व अनधिकृत रित्या झडपांची हाताळणी हे थांबून जास्तीत जास्त पाण्याची बचत करण्यात येत आहे जेणेकरून शहरातील सर्व भागांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. मात्र पहिल्या टप्प्यातील शहरातील सिडको N-5 मधील जलकुंभा अंतर्गत येणाऱ्या भागांनाच या अॅपची सुविधा मिळणार आहे. या भागांची यादी खालील प्रमाणे-
कोणत्या भागात मिळणार अॅपची सुविधा?
चिकलठाणा [वॉर्ड क्र.88,89] चौधरी कॉलनी [वॉर्ड:37] म्हाडा कॉलनी [वॉर्ड क्र.87,88] म्हसनतपुर [वॉर्ड:38] संजयनगर [वॉर्ड:85] नारेगाव [वॉर्ड:36] मथुरानगर [वॉर्ड: 40,64] एन 1 ए/बी सेक्टर [वॉर्ड : 38] एन-6 साईनगर/शुभश्री कॉलनी [वॉर्ड : 63] एन 1 टाऊन सेंटर सिडको बस स्टँड मघील [वॉर्ड :65 ] एन 6 शिवजोति कॉलनी एफ [वॉर्ड : 62] आविष्कार कॉलनी [वॉर्ड : 63] उत्तरनगरी [वॉर्ड:36] एन 8 गणेशनगर [वॉर्ड:40] एन 6 सिडको [वॉर्ड:64] एन 5 साऊथ | एन7 के सेक्टर [वॉर्ड:64,40] गुलमोहर कॉलनी [वॉर्ड:64] ब्रिजवाडी [वॉर्ड:36] संघर्षनगर | विट्टलनगर [वॉर्ड: 85,87] एन-3 सिडको [वॉर्ड:80] एन-2सिडको [वॉर्ड:81] ठाकरे नगर [वॉर्ड:81] एन-4 सिडको [वॉर्ड: 80] जयभवानीनगर [वॉर्ड:91] संतोषीमाता नगर [वॉर्ड:82] रामनगर [वॉर्ड:85,86] राजीव गांधी नगर [वॉर्ड:81,82] मुकुंदवाडी [वॉर्ड:82,83,84] संजयनगर [वॉर्ड क्र:85]
‘जल बेल’ ॲपचे फायदे
‘जल बेल’ ॲप द्वारे नागरिकांना त्यांच्या भागात येणाऱ्या पाण्याची वेळ, दिनांक, पाण्याचा कालावधी यांची माहिती देणारे एक नोटिफिकेशन मिळेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या भागात कधी पाणी येतंय याची माहिती मिळत राहील. पाणी येण्याच्या थोडा वेळ आधीदेखील या ॲप द्वारे नागरिकांना अलर्ट मिळेल. त्याचबरोबर महिनाभरात कधी पाणी आले,याचे वेळापत्रक देखील या ॲपवर असेल. या वेळापत्रकात पाण्याचा दिनांक, वार, वेळ आणि कालावधी यांची नोंद असेल. यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल. पाणी येण्यासाठी एक मिनिट जरी उशीर होणार असेल तरी देखील हे ॲप वापरकर्त्याला अलर्ट देईल. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याविषयी तक्रारी देखील नोंदवता येऊ शकतील. या ॲपचा डेमो म्हाडा कॉलनीत घेण्यात आला होता आणि हा डेमो यशस्वी देखील ठरल्याचा दावा मनपा प्रशासकांनी केला आहे.