Aurangabad | महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी रोज वाया, पुनर्वापरासाठी पुढाकार घेणार
अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad municipal corporation) कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले. या अंतर्गत कांचनवाडी, पडेगाव, झाल्टा फाटा येथे एसटीपी प्लांट सुरु केले. या तिन्ही प्रकल्पांमध्ये (waste water treatment plant) जवळपास 70 एमएलडी पाणी वापरायोग्य होते. एक MLD म्हणजे 10 लाख लीटर पाणी. मात्र प्रक्रिया केल्यानंतरही या पाण्याचा योग्य वापर होत नाही. यामुळे हे पाणी नदीपात्रात सोडले जाते. आता हे पाणी वापरायोग्य क्षेत्राकडे वळवण्यासाठी मनपा प्रयत्न करणार आहे. या पाण्याचा वापर सफारी पार्क आणि इतर कामांसाठी व्हावा, यासाठी महापालिका पुढाकार घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी दिली आहे.
शहरात तीन ठिकाणी एसटीपी प्रकल्प
मनपाने कांचनवाडी येथे 161 एमएलडी, पडेगाव येथे 10 एमएलडी तर झाल्टा फाटा इथं 35 एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लांट सुरु केले आहेत. या तिन्ही प्रकल्पांमध्ये अनुक्रमे 60 ते 70 एमएलडी , 2 एमएलडी आणि 6 ते 7 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी, डीएमआयसी, बांधकाम व्यवसायिक, वीटभट्टी चालकांनी वापरावे, यासाठी मनपाने प्रयत्न केले. मात्र समृद्धी महामार्ग वगळता इतरांनी प्रतिसाद दिला नाही. आता महापालिकेने या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका कशा प्रकारे वापर करणार?
– महापालिका पडेगावच्या प्लांटजवळ असलेल्या सफारी पार्कला हे पाणी देणार आहे. – तर कांचनवाडी येथील एसटीपी प्रकल्पातील 50 ते 60 एमएलडी पाणी दररोज वाया जाते. अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. – एसटीपीचे पाणी शहरात वापरले जावे, यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी नगररचना विभागाचे उपसंचालक ए.बी. देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
इतर बातम्या-