Aurangabad | नवीन पाणीपुरवठा योजना 24 महिन्यात पूर्ण करणार, जीव्हीपीआर कंपनीची औरंगाबाद महापालिकेला लेखी हमी!

शहरात आज 08 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र विरोधकदेखील या निमित्ताने शिवसेनेची कोंडी करण्याचा हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेची कोंडी होऊ नये म्हणून मनपा अधिकारीदेखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.

Aurangabad | नवीन पाणीपुरवठा योजना 24 महिन्यात पूर्ण करणार, जीव्हीपीआर कंपनीची औरंगाबाद महापालिकेला लेखी हमी!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:52 AM

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या (Aurangabad municipal corporation) तोंडावर शहरात गाजत असलेल्या पाणी समस्येवर (water problem) उपाय शोधण्यासाठी मनपा प्रशासकांकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. शहरातील जीर्ण झालेली जुनी पाणीपुरवठा योजना कशी बशी दुरुस्त ठेवण्याची कसरत केली जातेय. तर अत्यंत संथ गतीनं सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेलाही कशा प्रकारे वेग मिळेल, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. नवीन पाणीपुरवठा पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याची लेखी हमी मंगळवारी हे काम करणाऱ्या कंपनीकडून घेण्यात आली. जीव्हीपीआर कंपनीवर संबंधित योजनेचं कंत्राट (Contract) दिलेलं आहे. या कंपनीने मनपाला लेखी हमीपत्र सादर केलं. सध्या या योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य पाईप तयार करून टाकण्यासाठी प्रचंड विलंब लागतोय. देशातील नावाजलेल्या स्टील कंपन्यांकडून तयार केलेले पाईप मागवण्याचा निर्णयही मंगळवारी एका महत्त्वाच्या बैठकीत झाला.

कशी आहे नवी पाणीपुरवठा योजना?

राज्य शासनाने 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच सदर योजनेचं उद्धाटन झालं होतं. जायकवाडी धरणातून या योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. नवी योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. मात्र शहरात या योजनेचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादमनध्ये आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रशासनाने शहरातील पेटलेल्या पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी आढवा बैठक घेतली. याअंतर्गत प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी नव्या योजनेच्या कामाचाही आढावा घेतला.

जलवाहिनी टाकण्याचे काम 20 महिन्यांत

सध्या जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुढील 11 ते 20 महिन्यांत जायकवाडी ते शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करणार असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

टँकर चालकांचं बंड

शहरात आज 08 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र विरोधकदेखील या निमित्ताने शिवसेनेची कोंडी करण्याचा हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेची कोंडी होऊ नये म्हणून मनपा अधिकारीदेखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. यासाठीच शहरातील पाणी समस्येतील एक-एक अडचणींवर उपाय शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान, अतिरिक्त पाण्याची सोय करण्यात येत असताना मनपा कंत्राटदारांनी थकीत बिलासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. येथील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याचे कंत्राट शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याला दिलेले आहे. शहरात सध्या 200 पेक्षा जास्त वसाहतींना टँकरद्वारे पाणी देण्यात येते.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.