औरंगाबादच्या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू, तरुणीवर उपचार सुरू!

या दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल रात्री 11 वाजता गजाननचा मृत्यू झाला.

औरंगाबादच्या 'त्या' तरुणाचा अखेर मृत्यू, तरुणीवर उपचार सुरू!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 9:00 AM

औरंगाबादः औरंगाबादेत (Aurangabad) काल घडलेल्या घटनेत अखेर तरुणाचा मृत्यू झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) एकतर्फी प्रेमातून (One Sided love) काल भयंकर घटना घडली. माझ्याशी लग्न का करत नाही, असा सवाल करत तरुणाने स्वतःसोबत एका तरुणीलाही पेटवून दिलं. या दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रात्री ११ वाजता सदर तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणीवर अजूनही उपचार सुरु आहेत.

या घटनेबद्दल प्राथमिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून पूजा साळवे आणि गजानन मुंडे या दोघांची मैत्री होती. मात्र गजानन मुंडे याच्याविरोधात तिने काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. याच रागातून गजाननने हे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

औरंगाबादमधील हनुमान टेकडी भागात शासकीय विज्ञान संशोधन महाविद्यालयात सोमवारी दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली.

पीएचडी करणारी तरुणी प्रयोगशाळेत शिक्षिकेशी बोलत होती. तेव्हा गजानन तिथे आला. त्याने प्रयोगशाळेचा दरवाजा लावला. बॅगमधून आणलेल्या बाटलीतून आधी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्यानंतर पूजाच्या अंगावरही टाकले..

त्यानंतर माझ्याशी लग्न का करत नाहीस, असे म्हणत लायटरने स्वतःला पेटवलं आणि पूजाला मिठी मारली. हा प्रसंग पाहून शिक्षिकेने आरडाओरड सुरु केली. कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी धावत येत अग्निप्रतिरोध यंत्राच्या मदतीने आग विझवली. मात्र तोपर्यंत दोघेही गंभीररित्या भाजले होते.

या दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल रात्री 11 वाजता गजाननचा मृत्यू झाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.