Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद | घरकुल योजनेसेठी तीसगावातील आणखी 215 एकर जमीन मिळाली, घरे उभारण्याचा मार्ग मोकळा

शहरातील 51 हजार लाभार्थ्यांसाठी जागा निश्चित करून घरकुल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागेचा वाद आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनचतेमुळे आजवर ही योजना कागदावरच राहिली होती. शहरातील फक्त 355 जणांना घरकुल बांधून देण्यात आले होते. आता उर्वरीत लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत घरकुल मिळेल, अशी अपेक्षा आहे.

औरंगाबाद | घरकुल योजनेसेठी तीसगावातील आणखी 215 एकर जमीन मिळाली, घरे उभारण्याचा मार्ग मोकळा
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:31 PM

औरंगाबादः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad municipal Corporation) तीसगाव येथील 215 एकर जमीन देण्याचे आदेश महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने तीसगाव, हर्सूल, मिटमिटा येथईल 19 हेक्टर जमीन या योजनेसाठी उपलब्ध करून दिली आहे. या आदेशानंतर आता शहरातील घरकुल योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शहरात घरकुल योजना (Gharkul Scheme) सपशेल फोल ठरल्याचे आरोप भाजपवर केले होते. त्यानंतर शिवसेनेने या योजनेसाठी शहरात जमीनच दिली नसल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या वतीने देण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर योजनेसाठी जमीन देण्यात आली असून शहरातील या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

4 वर्षांपासून होता खोळंबा

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल उभारण्यासाठी महापालिकेने तयारी दर्शवली. त्यामुळे केंद्र सरकारने महापालिकेवर घरकुल उभारण्याची जबाबदारी सोपवली. महापालिकेने शहरातील नागरिकांकडून अर्ज मागवले असता 52 हजार अर्ज प्राप्त झाले. परंतु जिल्हा प्रशासनाकडून घरकुल उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली नाही. चार वर्षांपासून घरकुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला. खासदार इम्तियाज जलील यांनी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर संसदीय समितीने तातडीने यासंबंधी चौकशी अहवाल मागवला.

घरकुल योजनेचा मार्ग अखेर मोकळा

संसदीय समितीने अहवाल मागितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मिटमिटा, हर्सूल आणि तीसगाव येथील 19 हेक्टर जागा उपलब्ध करून दिली. महापालिकेने जमीन मोजणीचे शुल्क भरले. तसेच घरकुल उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी जाहिरातदेखील काढली. या 19 हेक्टर जागेत केवळ पाच हजारांपेक्षा कमी घरकुल होणार असल्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना विनंती केली. त्यानुसार, देसाई यांच्या पुढाकारातून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विभागामार्फत जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार, तीसगाव येथील आणखी 86 हेक्टर म्हणजेच 215 एकर जमीन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

शहरात घरकुलचे किती लाभार्थी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये शहरी भागातील बेघर, भूमीहीन नगारिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे, अभियानाची घोषणा केली होती. मार्च 2022 पर्यंत या अभियानाची मुदत आहे. औरंगाबाद शहरातून 80,518 अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती यातील 51 हजार लाभार्थ्यांसाठी जागा निश्चित करून घरकुल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागेचा वाद आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनचतेमुळे आजवर ही योजना कागदावरच राहिली होती. शहरातील फक्त 355 जणांना घरकुल बांधून देण्यात आले होते. आता उर्वरीत लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत घरकुल मिळेल, अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या-

‘नवाब बेनकाब हो गया’, आशिष शेलारांचा मलिकांना जोरदार टोला; नितेश राणेंसह अनेक भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा

Nawab Malik arrest | मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा..; चंद्रकांत पाटलांचा इशारा

तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.