औरंगाबादच्या मालमत्ता करात यंदाही वाढ नाही, कोरोनामुळे दरवाढ टळली, 10 वर्षांपासूनचा कर कायम!

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महापालिकेच्या वतीने वाढील मालमत्ता कराबाबत घोषणा होणे अपेक्षित असते. त्यानुसार, ही करवाढ यंदा होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. 2013 पासून मनपा प्रशासनाने मालमत्ता करात एक रुपयाही वाढ केलेली नाही.

औरंगाबादच्या मालमत्ता करात यंदाही वाढ नाही, कोरोनामुळे दरवाढ टळली, 10 वर्षांपासूनचा कर कायम!
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:29 AM

औरंगाबादः कोरोनाच्या संकटामुळे (Corona Pandemic) त्रस्त असलेल्या सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय औरंगाबाद महापालिका प्रशासानाने घेतला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा मालमत्ता कर (Property Tax) एक रुपयानेही न वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालमत्ता करात वाढ होणार किंवा नाही, याचे घोषणापत्र महापालिकेला द्यावे लागते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने हा निर्णय कळवण्यात आला आहे.

दहा वर्षांपासून करात बदल नाही

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महापालिकेच्या वतीने वाढील मालमत्ता कराबाबत घोषणा होणे अपेक्षित असते. त्यानुसार, ही करवाढ यंदा होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. 2013 पासून मनपा प्रशासनाने मालमत्ता करात एक रुपयाही वाढ केलेली नाही. दरवर्षी प्रशासनाकडून 25 टक्के दरवाढ सूचवण्यात येते. सत्ताधारी हा प्रस्ताव फेटाळून लावत असत. मागील दोन वर्षांपासून महापालिकेवर सत्ताधारी नाहीत. प्रशासकांच्या हाती महापालिकेचा कारभार आहे. मात्र कोरोनामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र 2022-23 या वर्षासाठी 25 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव करमूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांच्याकडून सादर करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या वर्षी दरवाढ करू नये, अशी सूचना केली.

शहरातील मालमत्तांचे कर निर्धारण कसे?

– अ प्रवर्गात स्लॅबचे घर असेल तर 11 रुपये चौरस फूट दर निश्चित करण्यात आला आहे. 500 चौरस फुटाला 3 हजार 228 रुपये मालमत्ता कर भरावा लागतो. – ब प्रवर्गात गोलपटावचे घर असेल तर 10 रुपये दराने 2 हजार 906 रुपये 500 चौरस फुटाला कर लावण्यात येतो. – क प्रवर्गात पत्र्याच्या घराला 500 चौरस फुटासाठी 9 रुपये याप्रमाणे 2 हजार 641 रुपये कर लागतो.

शहरातील मालमत्ताधारकांची संख्या किती?

निवासी- 2, 26, 714 व्यावसायिक- 24, 447 मिश्र- 5,512 औद्योगिक- 753 शैक्षणिक- 333 शासकीय- 129 एकूण- 2,57,888

इतर बातम्या-

घराचे बजेट कोलमडले….आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या!

सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.