Russia-Ukraine war | भाववाढीने पंपावर दिवसभर रांगा, औरंगाबादेत 20 टक्के जास्त पेट्रोलची विक्री!
औरंगाबादः येत्या 10 मार्चपासून इंधन दरवाढ होणार या धास्तीने सोमवारी शहरातील वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर (Aurangabad Petrol Pump) रांगा लावल्या होत्या. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जगभरात इंधन दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) पेट्रोलपंपांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. येत्या काही दिवसात पेट्रोलचे भाव वाढणार या धास्तीने ग्राहक जास्तीत […]
औरंगाबादः येत्या 10 मार्चपासून इंधन दरवाढ होणार या धास्तीने सोमवारी शहरातील वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर (Aurangabad Petrol Pump) रांगा लावल्या होत्या. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) जगभरात इंधन दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) पेट्रोलपंपांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. येत्या काही दिवसात पेट्रोलचे भाव वाढणार या धास्तीने ग्राहक जास्तीत जास्त पेट्रोल भरून घेऊ लागले. यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर तब्बल 20 टक्के जास्त पेट्रोलची विक्री झाली, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे देण्यात आली.
जास्त दरवाढ होण्याची भीती
रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उत्तर पर्देशसह पाच राज्यांतील निवडणुका संपल्याने मंगळवारपासून नवीन दर लागू होतील, अशा अफलेने सोमवारी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या. यामुळे शहरात 20 टक्के जास्त इंधन विक्री झाल्याची माहिती पेट्रोल डीलर्स असोसिेशनचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली. मात्र पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे काही पत्रक आले का, असे विचारले असता काल रात्रीपर्यंत असे काहीही पत्रक आले नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच इंधनाच्या दरात एकदम मोठी वाढ होणार नसून ती नेहमीसारखी 40-50 पैसे एवढी वाढ होऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
किराणा दुकानांवरही अतिरिक्त खाद्यतेलाची विक्री
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या धास्तीप्रमाणेच खाद्यतेलाचेही भाव वाढतील, या धास्तीने किराणा दुकानांनरही खाद्य तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. एका अंदाजानुसार, भारताला युक्रेनमधून 74 टक्के सूर्यफुलाचा पुरवठा केला जातो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे येत्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे किराणा दुकानांवरही खाद्य तेलाचा साठा करुन ठेवण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
इतर बातम्या-