Aurangabad | Raj Thackeray यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचं भाकित

शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे. पण मनसेच्या मागील मेळाव्यातही 300 रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Aurangabad | Raj Thackeray यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचं भाकित
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:41 AM

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा अंदाज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या मेळाव्यालाच (MNS Rally) 300 रुपये देऊन लोक आणले होते, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. येत्या 01 मे रोजी मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला एक लाखाहून अधिक लोक जमतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. आतापासूनच मराठवाड्यातील विविध संघटनांचे लोक मनसेच्या संपर्कात असून ते सभेला येण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे दावे फोल असल्याचा आरोप केला आहे.

सभेच्या वेळी तुम्हीच विचारा लोकांना- खैरे

राज ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील, असा अंदाज चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. ही सभा औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. शिवसेनेच्या अनेक ऐतिहासिक सभा येथे गाजल्या आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे. पण मनसेच्या मागील मेळाव्यातही 300 रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एवढंच नाही तर मीडियाने राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या वेळी लोकांना विचारले तर लोकच सांगतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे.

राज ठाकरेंची सभा पुढे ढकला- पोलीस

येत्या 03 मे पर्यंत राज्यातील मिशिदींवरचे भोंगे हटवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच येत्या 03 मे रोजी रमजान ईददेखील आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरेंची सभा 03 तारखेनंतर घ्यावी, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच सभेचे ठिकाण मराठवाडा सांस्कृतिक मंडळाऐवजी गरवारे स्टेडियमवर घेण्यात यावे, असा पर्यायही पोलिसांनी दिला आहे. मात्र मनसे 01 मे रोजीची तारीख आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान या दोन्ही गोष्टींवर ठाम आहे.

इतर बातम्या-

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘हा’ लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ज्या घरात या 5 गोष्टी केल्या जातात तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.