Auranagabad | ऐतिहासिक आदिल दरवाजा उजळणार, नूतनीकरण सुरु, दिवसा आणि रात्री कसे असेल चित्र?

2 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून या दरवाजा आणि तटबंदीचे नूतनीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीची डागडुजी करून तिला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल.

Auranagabad | ऐतिहासिक आदिल दरवाजा उजळणार, नूतनीकरण सुरु, दिवसा आणि रात्री कसे असेल चित्र?
नूतनीकरणानंतर आदिल गेट दिवसा (डावीकडे) आणि रात्री (उजवीकडे) असे दिसेलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद | शहरातील सुभेदारी विश्रामगृहाजवळील  ऐतिहासिक आदिल दरवाजा (Aadil gate) आणि त्याला लागून असलेल्या तटबंदीचे नूतनीकरण करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे (Aurangabad Administration) हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून या दरवाजाची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. मात्र आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकारातून दरवाजाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल 2 कोटी 25 लाख रुपये खर्च करून दरवाजाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण केले जाणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) आणि पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

किलेअर्कची तटबंदी असेही नाव

शहरात कोणत्याही राजकीय नेत्यांचे दौरे, बैठका होण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सुभेदारी विश्रामगृह. या विश्रामगृहाकडे जाताना जिल्हाधिकाऱ्यांना निवासस्थानाला लागून मोठी तटबंदी आहे. त्याला किलेअर्कची तटबंदीही म्हटले जाते. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वारे म्हणजे मीर आदिल दरवाजा. मागील अनेक दशकांमध्ये या दरवाजासह तटबंदीकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हा दरवाजा मोडकळीस आला आहे. आता तटबंदीचीही पडझड सुरु झाली आहे.

नूतनीकरणाचा प्लॅन काय?

2 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून या दरवाजा आणि तटबंदीचे नूतनीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीची डागडुजी करून तिला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल. हे काम लातूर येथील साईप्रम कंस्ट्रक्शन्सला 1 कोटी 51 लाख रुपयांत देण्यात आले आहे. त्यानंतर सुशोभिकरणासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली असून वास्तुविशारद प्रदीप देशपांडे हे काम पाहत आहेत. येथील तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी करता यावा, म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ओपन थिएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेरिटेज वॉक, परेड, पोलीस बँड, एनसीसी परेड, शैक्षणिक मेळावे आदी उपक्रम येथे घेता येतील, अशी योजना आहे.

इतर बातम्या-

Assembly Election Results 2022 LIVE Streaming: यूपी, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार?; TV9 वर असा पाहा निवडणुकांचा निकाल

जे राजस्थाननं केलं, छत्तीसगडनं केलं ते महाराष्ट्रही करणार का? पेन्शनबाबत काँग्रेस सरकारांची मोठी घोषणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.