Aurangabad | शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम लवकरच, गॅस पाइप लाइनसाठी सिमेंट रस्ते फोडू देणार नाही, मनपाचा इशारा काय?

केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर औरंगाबाद शहरात लवकरच गॅस पाइपलाइनचे जाळे उभारण्यात येईल. अहमदनगरमधून गंगागूप, वाळूज, बीड बायपासपासून पुढे शेंद्र एमआयडीस व करमाडपर्यंत पाइपलाइन टाकली जात आहे.

Aurangabad | शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम लवकरच, गॅस पाइप लाइनसाठी सिमेंट रस्ते फोडू देणार नाही, मनपाचा इशारा काय?
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 12:43 PM

औरंगाबादः शहरातील 108 रस्ते लवकरच गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने (Municipal corporation) वेगाने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र एकदा रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर गॅसपाइपलाइन (Gas pipeline) टाकण्यासाठी रस्ते (Roads in Aurangabad) फोडण्याची परवानगी महापालिका देणार नाही, अशा इशारा महापालिकेने दिला आहे. रस्ते तयार करण्यापूर्वीच भारत पेट्रोलियम कंपनीने गॅसची पाइपलाइन टाकावी, अशी सूचना महापालिकेने केल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार, शहरात गॅस पाइपलाइन टाकली जाणार आहे. मात्र शहरातील रस्ते दुरुस्तीपूर्वीच या पाइपलाइन टाकल्या जाव्यात, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

शहरातील 108 रस्त्यांची दुरुस्ती

औरंगाबाद महापालिकेने 317 कोट रुपयांच्या खर्चातून शहरातील 108 रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात या कामांना सुरुवात होईळ. महापालिकेने रस्त्यांच्या कामासोबतच गॅसची पाइप लाइन टाकून घेण्यात यावी, अशी सूचना महापालिकेने भारत पेट्रोलियमला केली आहे. जेणेकरून पुन्हा रस्ते खोदावे लागणार नाहीत. तसेच ज्या रस्त्यांची कामे झाली आहेत, तेथेही गॅसलाइन टाकण्यासाठी खोदकाम केले जाणार आहे. त्यासाठीचे पैसे कंपनीने पालिकेकडे भरले असल्याचेही प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले आहे.

शहरात लवकरच गॅस पाइपलाइनचे नेटवर्क

केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर औरंगाबाद शहरात लवकरच गॅस पाइपलाइनचे जाळे उभारण्यात येईल. अहमदनगरमधून गंगागूप, वाळूज, बीड बायपासपासून पुढे शेंद्र एमआयडीस व करमाडपर्यंत पाइपलाइन टाकली जात आहे. शहरातही स्टील लाइन आणि घरघरात 1 हजार 555 किलोमीटर गॅस वाहिनीचे जाळे उभारण्यात येईल. या कामाचा शुभारंभ 2 मार्च रोजी केंद्रीय पेट्रोलियम, नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते झाला आहे.

इतर बातम्या-

वीज कर्मचाऱ्यांचं पुण्यात आंदोलन, मेस्माविरोधात एकजूट; संप नको चर्चेतून तोडगा काढू : नितीन राऊत

अखेर मुंबईतील मत्स्यालयाचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत!

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.