Aurangabad: औरंगाबादकरांनो थर्टी फर्स्टला सांभाळूनच, नो डिजे, नो हुल्लडबाजी! वाचा पोलीस आयुक्तांची नियमावली!
थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या पार्टीकरिता औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्तांनी नवी नियमावली जारी केली आहे.
औरंगाबादः नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकिकडे औरंगाबादकर सज्ज झाले असताना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानेही तयारी सुरु केली आहे. शहरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या वतीनेही नियमावली जारी करण्यात आली आहे. या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस आयुक्तांचे आदेश काय?
थर्टी फर्स्ट किंवा नवीन वर्षाच्या आगमनाला पार्टी करण्याचे नियोजन करताना नागरिकांनी शहरात लागू असलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी नियमावली जारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
– कुठल्याही हॉटेलमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित उत्सव साजरा करण्यावर की बंधन घालण्यात आले आहे. – रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे. क्षमतेच्या निम्मेच लोक असा ठिकाणी उपस्थित राहू शकतील. – ड्रंक अँड ड्राइव्हवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. – रात्री उशिरापर्यंत डीजे लावून जल्लोष करणे यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. – रस्त्याने फिरताना पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरीत्या फिरता येणार नाही. – मास्क आणि सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करावा लागणार आहे. विना मास्क आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. – सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्याही पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
इतर बातम्या-