Aurangabad : संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा आज उघडणार, शिवसेनेच्या वतीने पहिले नाटक फ्री!!
नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले, त्यापूर्वी संत एकनाथ रंगमंदिरात चार वर्षांपूर्वी शेवटचा प्रयोग 25 मार्च् 2018 रोजी सर्किट हाऊस या नाटकाचा झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोग आज संत एकनाथ रंगमंदिरात मोफत दाखवण्यात येणार आहे.
औरंगाबादः मागील चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या आणि रंगकर्मींच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबादमधील संत एकनाथ रंगमंदिर (Sant Eknath Rangmandir) नाट्यगृहाचा पडदा आज उघडणार आहे. काही वर्षांपूर्वी नाट्यगृहाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. त्यानंतर नूतनीकरण झाल्यावर ते सुरु करण्यात येत आहे. मात्र या काळात तब्बल चार वर्षे उलटली. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून तसेच पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन पार पडले. आज 10 फेब्रुवारीपासून या नाट्यगृहाचा पडदा खऱ्या अर्थाने उघडत आहे. आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा येथे नाटकाची घंटा वाजणार आहे. शुभारंभाचा पहिला प्रयोग शिवसेनेच्या वतीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केला आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींसाठी हा प्रयोग मोफत असेल. पहिल्यांदा येणाऱ्यास संधी दिली जाईल, असे शिवसेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
व्हॅक्यूम क्लीनर नाटकाने शुभारंभ
नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले, त्यापूर्वी संत एकनाथ रंगमंदिरात चार वर्षांपूर्वी शेवटचा प्रयोग 25 मार्च् 2018 रोजी सर्किट हाऊस या नाटकाचा झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोग आज संत एकनाथ रंगमंदिरात मोफत दाखवण्यात येणार आहे. आज 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता हे नाटक असून पहिल्या पाच रांगा निमंत्रितांसाठी राखीव असून इतर जागांवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाईल. अष्टविनायक प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकात निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका आहे. नाट्यप्रेमींनी कोरोनाचे नियम पाळून या प्रयोगाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभापती राजू वैद्य, शहरप्रमुख विजय वाघचौरे, शिल्पाराणी वाडकर यांनी केले.
नूतनीकरणासाठी साडे आठ कोटी रुपये खर्च
दरम्यान, संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणावर महापालिकेने तब्बल साडे आठ कोटी रुपये खर्च केला आहे. तरीही येथील आसनव्यवस्थेबाबत अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. खुर्च्यांच्या दोन रांगेत पुरेसे अंतर नसल्याने प्रेक्षकांना इकडून तिकडे जायला अडचण होणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही बुधवारी याविषयी नाराजी दर्शवली. त्यामुळे आता या खुर्च्या बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.
इतर बातम्या-