VIDEO | औरंगाबादेत राडा, सातारा परिसरात तरुणाला अक्षरशः झोडपलं, 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून मारहाण

शहरातील बीड बायपास रोडवरील बजाज हॉस्पिटलच्या मागे सुधाकर नगर परिसरात ही घटना घडली. मारहाण सुरु झाल्यानंतर या आवाजाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले.

VIDEO | औरंगाबादेत राडा, सातारा परिसरात तरुणाला अक्षरशः झोडपलं, 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून मारहाण
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:50 AM

औरंगाबादः शहरातील सातारा परिसरात धक्कादायक घटना (Aurangabad rada) घडली. साते ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारणाऱ्या तरुणांनी घोळका करून एकानंतर एक असे तरुणाला मारायला (Young man beaten) सुरुवात केली. त्यानंतर लाठ्या-काठ्या आणि दगडानेही मारलं. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा (Aurangabad police) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुधाकर नगर रोडवर ही घटना घडली आहे.

राड्यानंतर तक्रारही नाही

दरम्यान, रात्री अशा प्रकारचा हल्ला झाल्यामुळे घटनेतील तरुण गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मात्र या प्रकरणी जखमी तरुणाच्या वतीने कुणाकडूनही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शहरातील बीड बायपास रोडवरील बजाज हॉस्पिटलच्या मागे सुधाकर नगर परिसरात ही घटना घडली. मारहाण सुरु झाल्यानंतर या आवाजाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर राडा थांबवण्यात आला. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इतर बातम्या-

वेदर रिपोर्ट : पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

Beed |आमदार नमिता मुंदडांना सेल्फीचा आग्रह धरणाऱ्याला बेदम मारहाण, सासरे नंदकिशोर मुंदडांच्या हाती काठी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.