Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Schools| औरंगाबादेत आजपासून बालवाडी ते चौथीचे वर्गही सुरु, कोचिंग क्लासेसलाही परवानगी, कोरोनाची स्थिती काय?

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 3 हजार 505 नवे रुग्ण आढळून आले. या काळात 17 लोकांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 218 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून त्यांचा एकूण आकडा 4 हजारांच्या घरात गेला आहे. मराठवाड्यात रविवारी एकूण 271 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

Schools| औरंगाबादेत आजपासून बालवाडी ते चौथीचे वर्गही सुरु, कोचिंग क्लासेसलाही परवानगी, कोरोनाची स्थिती काय?
शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:54 AM

औरंगाबादः शहरातील शाळांमध्ये आज खऱ्या अर्थाने किलबिलाट सुरु होणार आहे. कारण आजपासून बालवाडी ते चौथीपर्यंतचे  वर्गही सुरु झाले आहेत. महानगरपालिकेच्या (Aurangabad municipal corporation) हद्दीतील शहरातील सर्व शाळांचे बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे वर्ग आता सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आज 14  फेब्रुवारीपासून हे वर्ग सुरु झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) आल्यामुळे पंधरा दिवसच सुरु झाल्यानंतर पहिलीपासूनच्या शाळा (Aurangabad schools) पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दहावी, त्यानंतर आठवी नववीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग 7 फेब्रुवारीपासून सुरु झाले तर आज 14 फेब्रुवारीपासून शिशूवर्ग ते चौथीचे वर्ग भरवण्यात येत आहेत.

कोचिंग क्लासेसनाही परवानगी

आजपासून शहरातील कोचिंग क्लासेस पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठीदेखील महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. शाळांच्या बाबतीत ग्रामीणपेक्षाही शहरांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे. शाळा सुरु करताना 48 तासांपूर्वी स्रव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती, आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने, एक दिवसाआड बोलवण्यात यावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी नियंत्रणात असल्याचे दिसून आले. तरीही शहर परिसरात 49 तर ग्रामीण भागात 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. रविवारी 204 रुग्णांचा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील 24 तासात एकाचाही मृत्यू कोरोनामुळे झाला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 3 हजार 505 नवे रुग्ण आढळून आले. या काळात 17 लोकांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 218 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून त्यांचा एकूण आकडा 4 हजारांच्या घरात गेला आहे. मराठवाड्यात रविवारी एकूण 271 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. औरंगाबाद वगळता जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- जालना- 4 परभणी- 10 नांदेड- 33 हिंगोली- 07 बीड- 34 लातूर- 51 उस्मानाबाद- 33

इतर बातम्या-

ऐतिहासिक ‘रामसेतू’वरून नाशिककर विरुद्ध प्रशासन आमने-सामने; पूल पाडण्याचे काय सांगितले कारण?

मतदान ही बदलाची संधी, सर्वांनी मतदान करावे : उत्पल पर्रिकर

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.