औरंगाबादः छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shivaji Maharaj Jayanti) काही संघटना आणि पक्षांकडून तिथीनुसार साजरी करण्यात येते. यावेळी ही तिथी 21 मार्च रोजी असून औरंगाबादमध्ये (Aurangabad city) आज यानिमित्त मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. औरंगाबादमध्ये नुकताच देशातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकाजवळ शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने वाहतुकीत (Change in Traffic rout) काही बदल सूचवले आहेत. त्यानुसार, सोमवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत येथील क्रांती चौक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यादरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज शिवजयंतीनिमित्त शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्रीनिवास श्रीधरराव कानिटकर यांचे शिवचरित्राचे महत्त्व या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. शहरातील कलश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मनसेतर्फे अनाथ मुलांना पावनखिंड हा चित्रपटदेखील दाखवण्यात येणार आहे.
इतर बातम्या-