Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | चंद्रकांत खैरेंची खासदारकीची संधी पुन्हा हुकली, एमआयएम आणि भाजपला औरंगाबादेत रोखायचं कसं?

भाजपचे दोन मंत्री, एमआयएमचे खासदार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली मनसे अशा स्थितीत राज्यसभेची खासदारकी शिवसेनेला मिळाली असती तर चांगली बाब होती. मात्र ही संधी हुकल्यामुळे शिवसेनेचा गड राखून ठेवण्याचं मोठं आव्हान चंद्रकांत खैरे यांच्यासमोर आहे.

Aurangabad | चंद्रकांत खैरेंची खासदारकीची संधी पुन्हा हुकली, एमआयएम आणि भाजपला औरंगाबादेत रोखायचं कसं?
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 6:11 PM

औरंगाबादः राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच ही घोषणा केली. या जागेसाठी औरंगाबादचे एकेकाळचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचंही नाव चर्चेत होतं. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यासमोर पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा राज्यसभेच्या निमित्ताने खासदारकीची आशा लागली होती. यापूर्वीदेखील राज्यसभेवर जाण्याची खैरेंची एक संधी हुकली होती. आता पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात आल्यानं खैरे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खैरेंची राजकीय कारकीर्द काय?

लोकसभा निवडणुकीत सलग चार वेळा खासदार झालेले हे औरंगाबादचे एकमेव शिवसेना नेते आहेत. 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी खासदारकी भूषवली. माजी मुख्यमंत्री एआर अंतुले, माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, माजी खासदार उत्तमसिंग पवार आणि इतर उमेदवारांवर मात करत त्यांनी खासदारकी टिकवून ठेवली. मात्र 2019 मध्ये मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्यासमोर हार पत्करावी लागली. आजही ते स्वतःला जनतेच्या मनातील खासदार मानतात. तसं त्यांनी जाहिररित्या बोलूनही दाखवलं होतं. त्यानंतर मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही चंद्रकांत खैरे यांचं नाव चर्चेत होतं. तेव्हा ऐनवेळी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळाली होती. त्यामुळे खैरेंनी नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

एमआयएम, भाजपाचं मोठं आव्हान

पाणी प्रश्नावरून सध्या औरंगाबादकर नागरिक त्रस्त असून शहरातील इतरही अनेक समस्यांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर नागरिकांची नाराजी आहे. यातच एमआयएमचा वाढता प्रभावही शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाणी प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निघालेला विराट मोर्चा तर शिवसेनेला पोटात गोळा आणणारा ठरलाय. भाजपच्या डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे औरंगाबादेत त्यांचं एक वजन निर्माण झालंय. त्या तुलनेत शिवसेना मागे पडली आहे. त्यातच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंनी घेतलेल्या भव्य सभेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनाही बळ आलंय. त्यामुळे या तिन्ही पक्षांसमोर शिवसेनेचा गड कसा टिकवून ठेवायचा, हे मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.