औरंगाबाद : माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची कसलीही हेळसांड न होऊ देता त्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. पूजाअर्चा तसेच सगळे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, मृतेदह आणण्यासाठी रस्ताच नसला तर काय करावे ? मृतदेहावर अत्यंसंस्कार कसे करावे ? सध्या पुलाचे काम न झाल्यामुळे तसेच नदीला पूर आल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी विषद करणारी एक घटना समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. (aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)
मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड जिल्ह्याातील आमठाण परिसरात एका माणासाचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपासून औरंगाबादेत मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे या नदीवरील पुलाचे कामही झालेले नाही. त्याचा फटका येथील लोकांना बसत आहे. या परिसरात एका मणासाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला गावात अंत्यसंस्कारासाठी आणायचे होते. मात्र पुलाचे बांधकाम न झाल्यामुळे मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी गावकऱ्यांना थेट ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदत घ्यावी लागली. आधीच नदीवरील पुलाचे बांधकाम झालेले नाही. त्यातही नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंत्यसंकस्कार करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.
अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथे घडली होती. या गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली होती. या प्रसंगाचे काही फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी गावात तुषार मेहेर या तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी अपघातामुळे मृत्यू झाला होता. या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून रस्ताच नाही. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे जी पायवाट आहे, तीसुद्धा अतिशय बिकट झाली असून या मार्गावर पाणी साचले होते. या दयनीय परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांवर मृत तरुण तुषार मेहेर याचा मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला होता. सिल्लोड शहरातील वळण रस्त्यावर या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.
इतर बातम्या :
Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल
साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांत जोरदार राडा, 6 गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा https://t.co/TdybcR625i @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @SataraPolice #UdayanRajeBhosle #ShivendraRajeBhosle #Satara #RajeSupporters #Dispute #SataraPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2021
(aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)